घरठाणेडोंबिवलीतील महत्वाच्या रस्त्याचे होणार काँक्रीटीकरण

डोंबिवलीतील महत्वाच्या रस्त्याचे होणार काँक्रीटीकरण

Subscribe

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश, मानपाडा रस्त्याच्या कामाच्या निविदा येत्या २-३ दिवसात जाहीर होणार

डोंबिवली शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या अशा सागाव – मानपाडा रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ कोटी रुपये मंजूर केले होते. आता या कामाच्या निविदा येत्या २-३ दिवसात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महत्वाच्या रस्त्याचे मजबूतीकरण होणार असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

डोंबिवली शहरातील वाहतूक सुरळीत आणि वेगवान होण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विविध माध्यमातून निधी उपलब्ध केला आहे. या निधीतून सध्या शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण केले जाते आहे. डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचा प्रश्न नुकताच मार्गी लागलाआहे. त्यानंतर शहरातील वर्दळीचे आणि अरुंद रस्ते रुंद करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड सर्वात वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. डोंबिवली स्टेशन ते स्टार कॉलनी पर्यंतच्या रस्त्याचे यापूर्वीच केडीएमसीने सिमेंट कॉंक्रीटीकरण केले आहे .स्टार कॉलनी ते मानपाडा दरम्यानचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो.

- Advertisement -

या रस्त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने डांबरी रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. परिणामी वाहतूक संथ गतीने होत असते. त्याचा फटका वाहनचालकांना बसतो. त्यामुळे या रस्त्याचे मजबुतीकरण करत असताना कॉंक्रिटीकरण करावे , अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. गेल्या वर्षात या रस्त्यासाठी २५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून या रस्त्यासाठी निविदा येत्या २ – ३ दिवसात जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हा रस्ता २.०५ किलोमीटरचा असून या रस्त्याची रुंदी १४ मीटर इतकी असणार आहे. या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागल्याने डोंबिवली शहरातून कल्याण शीळ रस्त्यावर वेळेत पोहोचणे सोपे आणि सहज होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -