घरठाणेठामपाच्या काही अधिकाऱ्यांच्या  हलगर्जीमुळे समतानगरमधील नागरिकांच्या जीवास धोका

ठामपाच्या काही अधिकाऱ्यांच्या  हलगर्जीमुळे समतानगरमधील नागरिकांच्या जीवास धोका

Subscribe

आमदार सरनाईक यांचा आरोप

समता नगर, राजीव गांधी कंपाउंड येथील पंचरत्न चाळीतील सहा घरांचा सज्जा पडून एक जखमी झाला. या दुर्घटनेनंतर बुधवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी त्या वसाहतीस भेट दिली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडून एमएमआरडीएच्या मालकीच्या असलेल्या वर्तकनगर येथील आकृती हब टाऊन या इमारतीमधील घरे तात्पुरत्या स्वरूपात या ४२ रहिवाश्यांसाठी घेतल्यामुळे सध्या तरी या रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरूपात निवारा मिळालेला आहे. परंतू, या सर्व रहिवाश्यांना कायमस्वरूपी घरे मिळण्यासाठी महानगरपालिकेने लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा व रहिवाश्यांना न्याय द्यावा. तसेच या प्रकल्पाच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार त्यांनी केली.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १९९७ साली रस्त्याचे रूंदीकरण करीत असताना तात्कालीन आयुक्त टी चंद्रशेखर यांनी समतानगर व लोकमान्यनगर पाडा नं. १ येथील काही भुखंडावर विस्थापितांचे पुर्न:वसन केले होते. तात्कालिन शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रयत्नाने सर्व विस्थापितांना ही जागा मिळाली होती. त्यावर सर्व रहिवाश्यांनी आपल्या आर्थिक कुवतीनुसार तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम केले होते. तर समतानगर येथील राजीव गांधी नगर येथे काही विस्थापितांनी २ अथवा ३ मजल्याच्या इमारती बांधल्या होत्या. या बांधकामाला २४ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असल्याकारणाने ही सर्व घरे व इमारती धोकादायक झालेल्या आहेत.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी समतानगर येथील आनंदराम मधील विस्थापितांच्या वसाहतीमधील काही घरे पडली असता तात्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देऊन या सर्व विस्थापितांना मालकी तत्वावर घरे मिळावीत या उद्देशाने वर्तकनगर येथील इमारत क्रं. ५४,५५,५६ या इमारतींची ज्या पध्दतीने पीपीपी तत्वावर बांधणी झाली त्याच पध्दतीने या वसाहतींचे पुर्नवसन करण्यासंदर्भात महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांना जबाबदारी दिलेली होती. परंतू,आमदार सरनाईक यांनी सर्व रहिवाश्यांसह मोहन कलाल यांच्याकडे पाठपुरावा करून सुध्दा अद्यापपर्यंत या प्रकल्पाला कुठलीही गती प्राप्त झालेली नाही.

चार महिन्यांपूर्वी विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर आमदार प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली असता, आयुक्तांनी या संदर्भातील कार्यवाही करण्याचे आदेश मोहन कलाल यांना दिले होते. या घटनेला देखील चार महिने उलटूनही प्रकल्पाला गती प्राप्त झालेली नाही. याउलट मंगळवारी २७ जून, २०२३ रोजी दुपारच्या वेळेस या परिसरातील दोन चाळींचे सज्जे कोसळल्याची दुर्घटना घडली. सज्जे कोसळण्याची घटना जर सकाळच्या वेळेस घडली असती तर मोठी दुर्घटना होऊन जिवितहानी सुध्दा झाली असती, असे रहिवाश्यांचे म्हणणे आहे. असे सरनाईकांनी सांगितले.
समतानगर मधील राजीव गांधी नगर येथे भेट देताना अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, उपायुक्त मनोज जोशी, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, विभागप्रमुख  भगवान देवकते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -