घरठाणेEknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांचे गुजराती भाषेतून भाषण; नेटकऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांचे गुजराती भाषेतून भाषण; नेटकऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया

Subscribe

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गेल्या वर्षी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. परंतु आज त्यांना महाराष्ट्रात मराठी बोलण्याची लाज वाटते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण एका कार्यक्रमात गुजराती बांधवांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी गुजराती भाषेतून सुरूवात केली. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(Eknath Shinde : Chief Minister Shinde’s speech in Gujarati; Netizens reacted strongly)

भारतीय राज्यघटनेतील 22 अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश करण्यात आला आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. असे असतानाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून गुजराती भाषेचे गुणगान गायले जात आहेत. ठाण्यात 20 जून रोजी संध्याकाळी आयोजित गुजराती कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी डोक्यावर पागडी आणि कपाळावर टीळा लावत आपल्या भाषणाची सुरूवात गुजराती भाषेने केली. यामुळे मुख्यमंत्र्यांना उपस्थित प्रेक्षकांकडून टाळ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. परंतु यासंदर्भात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रथावर बसून घोडा, बैलबंडी हाकत होते का?; कोविड लसीवरून उपमुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

- Advertisement -

मराठी भाषेचा अपमान केल्याबद्दल गुन्हा नोंदवावा

एकनाथ शिदेंचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी म्हणाले की, काय किडके लोक मिळाले आहेत महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून, यांनी मराठी बोलायची लाज वाटते आणि आम्हाला यांची लाज वाटते. दुसऱ्या एका नेटकऱ्यांने म्हटले की, महाराष्ट्रात राहून जर मराठी बोलली जात नसेल तर ही खरी शोकांतिका आहे. फक्त मतांसाठी आपण आपली मातृभाषा सोडतोय. तिसऱ्या नेटकऱ्यांने लिहिले की, आम्हाला स्टॅलिन सारखा स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगणारा आणि मान राखणारा हवाय, गुजरातचा गुलाम नाही. दुर्देवी महाराष्ट्र!!! दुर्दैवी मराठी भाषा!!! मराठीचा गद्दारनाथ!!, तर आणखी एका नेटकऱ्यांने लिहिले की, 107 हुतात्म्यांचा आणि मराठी भाषेचा अपमान केल्याबद्दल गुन्हा नोंदवावा.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -