घरठाणेवयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

Subscribe

कल्याण । मोहने येथील एनआरसी शाळेच्या 1989 दहावी मराठी माध्यमाच्या वयाची ५० वर्षे झालेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवार 7 एप्रिल रोजी संपन्न झाले. या स्नेहसंमेलनात वयाची 75 ते 80 पार झालेल्या 20 माजी शिक्षकांनी सहभाग घेतला. देश-विदेशात स्थायीक झालेल्या वयाच्या ५० वर्षेपुढच्या माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे मुख्य प्रवेशाद्वारापासून पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या आतषबाजी करून स्वागत केले. त्यानंतर व्यासपिठावर शिक्षकांना सन्मानपूर्वक आणण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने करण्यात आली. या कार्यक्रमात दिवगंत शिक्षक आणि दिवंगत विद्यार्थ्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना श्रध्दाजंली वहाण्यात आली. पस्तीस वर्षानंतर एकत्रीत येण्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर ओसांडून वहात होता. या स्नेह संमेलनास एनआरसी शाळेचे मुख्याध्यापक संजय मेहता, मराठी माध्यमाचे सर्व माजी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन केल्या बद्दल सिध्दार्थ माने, रणधिर शिंदे आणि अजय नेव्हे यांचे आभार मानले. त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -