घरक्राइमGanpat Gaikwad : गणपत गायकवाडांचा मुलगा अद्यापही बेपत्ता; रंजित यादवला 14 फेब्रुवारीपर्यंत...

Ganpat Gaikwad : गणपत गायकवाडांचा मुलगा अद्यापही बेपत्ता; रंजित यादवला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Subscribe

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाचाही समावेश आहे. पण गणपत गायकवाड यांच्या मुलगा बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ठाणे : उल्हासनगरमधील हिललाइन पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. आज पोलिसांनी रंजित यादवला ठाणे गुन्हे शाखेने अटक केले आहे. रंजित यादव हा गणपत गायकवाड यांचा वाहनचालक असून पोलिसांनी त्याला आज उल्हासनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने रंजित यादवला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात गणपती गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र या वृत्ताला पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिला नाही.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केले आहे. यात आमदार गणपत गायकवाड, व्यावसायिक विकी गनत्रा, हर्षल केने, संदीप सरवणकर आणि रंजित यादवला ठाणे गुन्हे शाखेने अहमदनगर येथून अटक केले आहे. या प्रकरणी व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गणपत गायकवाड यांच्या मुलाचाही समावेश आहे. पण गणपत गायकवाड यांच्या मुलगा बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गणपत गायकवाड हे कळवा पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar Funda : पक्षाचे नाव ठरविताना 25 वर्षांपूर्वीचीच चाल; राष्ट्रवादीवर पवारांचीच छाप

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव हा महिनाभरापासून सुरू असलेल्या जमिनीच्या प्रकरणात तक्रार देण्यासाठी शुक्रवारी (2 फेब्रुवारी) आपल्या कार्यकर्त्यांसह उल्हासनगरमधील हिललाइन पोलीस ठाण्यात आला होता. त्याचवेळी महेश, पाटील व चैनू जाधव हे देखील आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यानंतर गणपत गायकवाड हे देखील आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले. यावेळी हिललाइन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाच्या दालनात गणपत गायकवाड यांनी रात्री उशीरा महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -