घरठाणेडोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांची दादागिरी

डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांची दादागिरी

Subscribe

दोघा फेरीवाल्यांनी एका नागरिकाला केली बेदम मारहाण 

 काही दिवसांपूर्वी डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी रुग्णवाहिका चालकास मारहाण केल्याचे प्रकरण घडले होते. त्यानंतर  मनसेने फेरीवाला मुक्त डोंबिवली स्टेशन परिसर आंदोलन केले होते. मात्र काही दिवसातच मनसेचे आंदोलन शांत झाल्याने पुन्हा स्टेशन परिसर फेरीवाल्यांनी पुन्हा गजबजला आहे. रस्त्यावर ठेवलेले सामान बाजूला करण्यास सांगितल्याचा रागातून  मंगळवारी डोंबिवली पूर्वेत एका नागरिकाला दोघा फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यातून फेरीवाल्याची दादागिरी वाढली असल्याचे दिसून येते.

नरेश चव्हाण हे मंगळवारी रात्री साड़े आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेत स्टेशनच्या दिशेने जात होते. मधूबन सिनेमाच्या गल्ली मधून पायी चालत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते.नागरिकांना चालण्यासाठी जागा मिळत नव्हती . चव्हाण यांनी फेरीवाल्यांना सामान एका  बाजूला करण्यास सांगितले.याचा राग आल्याने जितलाल वर्मा आणि श्रीपाल वर्मा यांनी चव्हाण यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली  पोलीस ठाण्यात दोघा फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मनसेने केलेल्या आंदोलनामुळे  डोंबिवली पूर्व स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झालेला डोंबिवलीकरांनी पहिला आहे.सातत्य ठेवणे हि प्रशासनाची जबाबदारी आहे .पालिका प्रशासनाला जर स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करता येत नसेल तर मनसैनिक ते करून दाखवतील.फेरीवाला प्रश्नांबाबत मनसे पदाधिकारी पुन्हा एकदा पालिका आयुक्तांची भेट घेणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -