घरठाणेठाण्यात पहिल्याच दिवशी परदेशात जाणाऱ्या १९५ विद्यार्थ्यांनी घेतली लस

ठाण्यात पहिल्याच दिवशी परदेशात जाणाऱ्या १९५ विद्यार्थ्यांनी घेतली लस

Subscribe

विद्यार्थ्यांसाठी 'वॉक इन' पद्धतीने सुरु केलेल्या लसीकरण मोहीमेंतर्गत आज पहिल्याच दिवशी १९५ विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.

राज्यात कोरोना लसीचा साठा अपुरा असल्याने अनेक लाभार्थ्यांचे लसिकरण रखडले आहे. त्याचतच ठाण्यात परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ पद्धतीने सुरु केलेल्या लसीकरण मोहीमेंतर्गत आज पहिल्याच दिवशी १९५ विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कोवॅक्सिन लसीचा पहिला डॉस देण्यात आला. गेल्या अनेक दिवंसापासू लसीचा तुटवडा असल्याने विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांनी लस घेतल्यानंतरच त्यांना परदेशात प्रवेश मिळणार होता. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाच्या निर्देशनानुसार परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्याची नियोजन केले. त्यानुसार सोमवार पासून लसीकरण सुरू करण्यात आले असून पहिल्याच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जावू नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात ‘वॉक इन’ लसीकरण सुविधा महापालिकेच्यावतीने उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सदरच्या केंद्रात लस देण्यात येत असून परदेश प्रवेशपत्र, व्हिसा तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करूनच लस देण्यात येत आहे. तरी महापालिका क्षेत्रातील परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -