घरठाणेसर्वसामान्य जनतेला आरोग्याची चिंता असता कामा नये, ही शासनाची भूमिका- मुख्यमंत्री एकनाथ...

सर्वसामान्य जनतेला आरोग्याची चिंता असता कामा नये, ही शासनाची भूमिका- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

कल्याण । सर्वसामान्य जनतेला आरोग्याची चिंता असता कामा नये ही शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. डोंबिवलीत उभारल्या जाणाऱ्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय व प्रसूती गृहाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले, त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. शास्त्रीनगर रुग्णालयात NICU आणि PICU उभारण्यासाठी खासदार निधीतून अर्थसहाय्य देण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी आरोग्य सुविधांना प्राधान्य दिले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. सर्वसामान्यांसाठी असलेल्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचे संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाखापर्यंत होते ते ५ लाख पर्यंत करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली (पूर्व) दत्तनगर आयरे रोड वरील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, नव्याने उभारले जाणारे फिश मार्केट यांचे ऑनलाइन भूमिपूजन करण्यात आले आणि सुनील नगर , डोंबिवली पूर्व येथील अभ्यासिका, शास्त्रीनगर रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) व शवविच्छेदन केंद्र यांचेही ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी मिळून “शासन आपल्या दारी” हा सर्व जनतेच्या हिताचा, उपयोगाचा उपक्रम सर्वत्र सुरू केला आहे, असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शासनाचे व हा उपक्रम राबविणाऱ्या अधिकारी वर्गाचे देखील यावेळी आभार मानले. पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही यावेळी समायोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -