घरठाणेखासदार शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टच्या ठरावाची बदलापूरमध्ये होळी

खासदार शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टच्या ठरावाची बदलापूरमध्ये होळी

Subscribe

कचरा प्रकल्पाबाबत रिट पिटिशन दाखल करणार

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वप्नातील कचरा प्रकल्पाच्या विरोधात बदलापूरमध्ये आंदोलन करण्यात आले. बदलापूर शहर महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रस्तावित कचरा प्रकल्पाच्या टेंडरची होळी करण्यात आली. बदलापूर पश्चिमेच्या गडकरी चौकात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बदलापूरच्या वालीवली परिसरातील डम्पिंग ग्राउंड वर, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अद्ययावत कचरा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. स्पेनच्या धर्तीवर हा प्रकल्प तयार केला जाणार आहे. या प्रकल्पात अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करून कचर्‍याची विल्हेवाट लावली जाणार आहे. मात्र या प्रकल्पाला महाविकास आघाडीने विरोध केला आहे.

बदलापूर मध्ये शुक्रवारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. या आंदोलनात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रस्तावित प्रकल्पाच्या ठरावाची होळी केली. तर स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात रोष व्यक्त केला.अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांचा मिळून सुमारे 600 टन कचरा दररोज बदलापुरमध्ये येणार आहे. त्यामुळे दुर्गंधी,प्रदूषण आणि इतर त्रास होणार असल्याने ग्रामस्थांनी सुद्धा या प्रकल्पाला विरोध केला आहे.

- Advertisement -

बदलापूर शहरात अंबरनाथ आणि उल्हासनगरचा कचरा नको अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली. काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. या आंदोलनावेळी सध्या सुरू असलेलं डम्पिंग सुद्धा बंद करू अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष दामले, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव, शहर प्रमुख किशोर पाटील, प्रियांका दामले, अविनाश देशमुख, कालिदास देशमुख, माजी नगरसेवक प्रभाकर पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -