घरठाणेशालेय कर्मचार्‍यांच्या देयकांच्या पे शिट्स शाळांना पाठवाव्यात

शालेय कर्मचार्‍यांच्या देयकांच्या पे शिट्स शाळांना पाठवाव्यात

Subscribe

शिक्षण क्रांती संघटनेची मागणी

शालेय कर्मचार्‍यांच्या देयकांच्या पेशिट्स सही शिक्क्यासह बँक कॉपी आणि स्कुल कॉपी प्राप्त झाल्याशिवाय कर्मचार्‍यांच्या खात्यावर मंजूर देयके वर्ग होत नाही. त्यामुळे अशा पे शिट्स लवकरात लवकर साक्षांकित करून वितरित कराव्यात अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी लेखी पत्राद्वारे ठाणे-पालघर माध्यमिक वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक संतोष कांबळे यांच्याकडे केली आहे. शालेय कर्मचार्‍यांच्या देयकाच्या प्रति साक्षांकित करण्यासाठी कर्मचार्‍यांना ठाणे व पालघर जिल्ह्यातुन लांबचा पल्ला गाठून यावा लागतो. त्याचबरोबर या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मागील मार्च 2023 अखेरीस प्रलंबित देयके अथक प्रयत्नाने मंजूर झाल्याने कर्मचार्‍यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

पद्मश्री आण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयातील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, शिक्षण सेवक पुरवणी देयके,पे शिट्स धारकांची 7 व्या वेतन आयोगानुसार पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील रोखीचे फरक, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या 7 व्या वेतन आयोगाच्या रकमा, वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे फरक आदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाची देयके आपल्या कार्यालयाकडून मंजूर होऊन शाळेच्या बँक खात्यावर जमा झालेली आहेत. मात्र साक्षांकित झालेल्या बँक व शाळेच्या पे शिट्सच्या प्रती प्राप्त झाल्याशिवाय संबंधित कर्मचार्‍यांच्या खात्यावर जमा रकमा वर्ग होत नाहीत. त्यामुळे सर्व पे शिट्सच्या प्रती शाळेला पाठविण्याची मागणी देखील या पत्राद्वारे शिक्षण क्रांती संघटनेने अधीक्षकांकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -