घरठाणेघोडबंदर परिसरात रंगणार भीमजन्मोत्सव

घोडबंदर परिसरात रंगणार भीमजन्मोत्सव

Subscribe

बुद्ध धम्म संस्कार संस्थेचे आयोजन

संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 वा जन्मोत्सवाच्या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन घोडबंदर कासारवडवली परिसरातील बुद्ध धम्म संस्कार या संस्थेच्या माध्यमातून ठाणे महापालिका मैदान, स्वस्तिक रेसिडेन्सी समोर आनंद नगर येथे करण्यात आलेले आहे. 13 एप्रिल संध्याकाळ पासुनच भीमजन्मोत्सवाची सुरूवात होणार आहे. बहारदार भीम गीतांचा जल्लोष, लोकनृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रम हे 13 एप्रिलला सायंकाळी होणार आहेत.
14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजल्यापासून विजय पार्क ते ठाणे महापालिका मैदान आनंद नगर या मुख्य कार्यक्रम स्थळा पर्यंत पांढरे शुभ्र वस्त्र आणि निळा केशरी फेटा परिधान केलेल्या भीम अनुयायांकडून धम्मविचार मिरवणूक काढण्यात येईल.

विविध वयोगटातील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, महामानवांच्या जीवनावर आधारित वेशभुषा स्पर्धा, वैयक्तिक नृत्य स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पाल्यांचा यथोचित सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून विचार मंचावर सत्र न्यायालय आंबेजोगाई येथील अ‍ॅडव्होकेट अविनाश धायगुडे बाबासाहेबांच्या जीवनावरील विचार मांडणार आहेत. घोडबंदर परिसरात होत असलेल्या भीम जन्मोत्सवाच्या जयंती कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे बुद्ध धम्म संस्कार संस्थेच्या जयंती आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -