विठ्ठल मंदिरात केंद्रिय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पूजा

जिल्ह्यात सुख समृध्दी लाभू दे अशी बळीराजासाठी पावसाला प्रार्थना करुन सर्वाना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

Kapil-Patil
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील

आषाढी एकादशीच्या निमित्ताने उल्हासनगरातील शहाड येथे असलेल्या सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात केंद्रिय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पूजा पाठ करण्यात आले. यावेळी पाटील यांनी देशात राज्यात आणि जिल्ह्यात सुख समृध्दी लाभू दे अशी बळीराजासाठी पावसाला प्रार्थना करुन सर्वाना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

उल्हासनगर कॅंप एक येथील शहाड जवळ सेंच्युरी रेयॉन कंपनीने भव्य दिव्य असे विठ्ठल मंदिर उभारलेले आहे. या विठ्ठल मंदिरात दरवर्षी आषाढी निमित्त सकाळीच पुजा पाठचा कार्यक्रम होत असतो. तर या मंदिरात देखील पुजेचा मान हा पंढरपुरच्या विठुराया प्रमाणेच वरिष्ठ अधिकारी किंवा लोक प्रतिनिधी यांना मिळत असतो. या वर्षीचा पूजेचा मान हा देशाचे केंद्रिय पंचायत राज, राज्यमंत्री कपिल पाटील यांना मिळाला आहे. त्यांनी सकाळीच विठ्ठल मंदिरात येऊन पुजा अर्चना केली आहे.

या पुजेच्या वेळी सेंच्युरी रेयॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ओ.आर.चितलांगे, सीएमओ एच एस डागर उपस्थित होते. तर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी या प्रमुख पाहुण्याचे सवागत केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले बद्दल कंपनी व्यवस्थापनाने ललका यांचे कौतुक केले आहे. या वेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान चितलांगे यांच्या पुढाकाराने दिंडी काढण्यात आली. या दिंडी यात्रेत आमदार गणपत गायकवाड माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते.