घरठाणेकेडीएमसीच्या आरक्षित भूखंडाचा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहीर लिलाव

केडीएमसीच्या आरक्षित भूखंडाचा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहीर लिलाव

Subscribe

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आरक्षण टांगणीला

कल्याण कृषी बाजार उत्पन्न समितीच्या आवारात असलेला कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरक्षित भूखंड भाड्याने देण्याचा मनसुबा रचला गेला आहे. पुढील आठवड्यात याचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याने मालकी नसलेल्या आरक्षित भूखंडाची कृषी उत्पन्न बाजार समिती विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना पालिका प्रशासन मात्र मूग गिळून बसल्याचे दिसून येत आहे. कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातील खुली जागा कल्याण डोंबिवली महापालिकेने पोस्ट ऑफिस व पिकनिक स्पॉटसाठी आरक्षित ठेवली गेली आहे. भूखंडाच्या आरक्षित क्षेत्राचे 3338 चौ.मी. क्षेत्र आहे. भाडे कराराने कृषी उत्पन्न बाजार समिती हा भूखंड एका लिलावाद्वारे करणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीला महिन्याला जास्तीत जास्त भाडे देणार्‍यास भूखंड उपलब्ध करून देणार आहे. आरक्षित भूखंड महापालिका जोपर्यंत पोस्ट ऑफिस व पिकनिक स्पॉटसाठी संपादित करत नाही तोपर्यंतच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर देणेकरीता जाहिर लिलाव बुधवारी 27 तारखेस रोजी दुपारच्या सुमारास समितीच्या कार्यालयात उघड बोली पद्धतीने होणार आहे.

अशा पद्धतीची जाहिरात वर्तमान पत्रात कृषि उत्पन्न बाजार समितीने देऊन आपला मनसुबा जाहीर केला आहे. परंतु आरक्षण नियमावलीनुसार ते बेकायदेशीर असल्याचे कल्याण डोंबिवली मनपा नगर रचना विभागाच्या अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तसेच या संदर्भात कृषि उत्पन्न बाजार समितीने कुठलाही पत्र व्यवहार मनपाशी केला नसल्याचे सांगितले. शासनाचे अंग असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या या धोरणामुळे कल्याण डोंबिवली मनपाच्या आरक्षित भुखंडाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे येताना दिसत आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीने ओपन टेरस देखील भाड्याने देण्याचा प्रस्ताव आणला असल्याने तो कायदेशीर आहे का? असा सवाल देखील यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

- Advertisement -

तेव्हा पालिकेला जागा देणार
याबाबत कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव कानिक पाटील यांनी सांगितले की, या जागेबाबत लिलाव काढला असून ही जागा महापालिकेची आरक्षित आहे. पालिकेला ही जागा लागेल तेव्हा जागा पालिकेला देण्यात येईल. असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -