घरठाणेकल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टीची विक्रमी वसूली

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टीची विक्रमी वसूली

Subscribe

६२२.०७ कोटी मालमत्ता कर तर ७४.७२ कोटी पाणीपट्टीची वसूली  

कल्याण : मालमत्ता कर हे महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. कल्याण डोंबिवली  महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी वेळोवेळी स्वतः लक्ष घालून सर्व सहा. आयुक्त व कर अधिक्षकांसमवेत कर व पाणीपट्टी वसूलीबाबत आढावा बैठका घेतल्या आणि आयुक्तांच्या प्रोत्साहनपर व प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे सर्व प्रभागातील कर अधिक्षक यांच्यातील उत्साह वाढून त्याचे फलीत म्हणून मार्च-२०२४ अखेर मालमत्ता कराची रक्कम रु.६२२.०७ कोटी इंटर्नल रिसिप्टसह व पाणीपट्टीची रक्कम रू.७४.७२ कोटी इंटर्नल रिसिप्टसह इतकी विक्रमी वसूली झाली.
महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या अधिनस्त सर्व सहा. आयुक्त व प्रभागातील कर विभागाच्या कर्मचा-यांनी अथकपणे व नेटाने कर वसूलीचे काम केल्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत ही विक्रमी कर वसूली झाली आहे. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातही करदात्यांनी या वर्षीच्या प्रारंभापासून शक्यतो ऑनलाईन सुविधेव्दारे कराचा भरणा करुन महापालिकेस यापुढेही असेच सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -