घरठाणेधावत्या कारला आग !

धावत्या कारला आग !

Subscribe

अंबरनाथ पूर्व मोतीराम पार्क संकुलात धावत्या कारला अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. अखेर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष मिलिंद मोरे यांनी अंबरनाथ पूर्व मोतीराम पार्क येथून जाणाऱ्या कारमधून पेट्रोलचा धूर निघत असल्याची माहिती कार चालकाला नागरिकांनी दिली.

चालकाने गाडी थांबवली, तोपर्यंत आग लागल्याने गाडीतील प्रवासी तातडीने बाहेर आले. आगीमुळे ब्रेक्स सुद्धा फेल झाले होते आणि उतारावर उभी असलेली कार धुराच्या लोटाने पेटू लागली.  गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी जात असल्याचे पाहून चालक आणि प्रवाशांनी बाहेर उड्या टाकल्या.अखेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांनी तातडीने आनंदनगरच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. ही जळती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकल्याने थांबली.  घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत  कार पूर्णपणे जळून खाक झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -