घरठाणेभाजप गटनेत्याला घेराव घालणे शिवसैनिकांच्या अंगलट

भाजप गटनेत्याला घेराव घालणे शिवसैनिकांच्या अंगलट

Subscribe

'त्या' नगरसेवकांसह ३० ते ४० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोरोना आपत्तीच्या काळात १०० ते १५० जणांने घेराव घालणाऱ्या शिवसेना नगरसेवक, नगरसेविका आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या अंगलट आले आहे. भाजपने केलेल्या कारवाईच्या मागणीनुसार, त्या नगरसेवक आणि ३० ते ४० शिवसैनिकांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांना जमा होण्याबरोबरच रोखण्यात टाळाटाळ केल्याबद्दल महापालिका मुख्यालयात सुरक्षा रक्षकांवर कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

शहरात अनावश्यक असलेले तीन पादचारी पूल उभारून १३ कोटी रुपयांची लूट केली जात असल्याच्या प्रकारावर भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच या खर्चातून शिवसेनेकडून निवडणूक निधी जमा केला जात असल्याचा आरोप केला होता. आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी शिवसेनेने घेराव घातला, असा आरोप डुंबरे यांनी केला होता.

- Advertisement -

दरम्यान शिवसेनेच्या नगरसेविका राधिका फाटक, मिनल संखे, साधना जोशी, नगरसेवक दिलीप बारटक्के, विकास रेपाळे, सिद्धार्थ ओवळेकर यांच्यासह १००-१५० कार्यकर्ते गटनेत्यांच्या दालनात विनामास्क घुसले. तसेच त्यांनी गटनेते डुंबरे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करून आठ दिवसांत माफी मागण्यासाठी धमकी दिली. कोरोनाच्या काळात अशा प्रकारे गर्दी जमवून कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा, भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला होता.

तसेच या संदर्भात ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदनही दिले होते. त्यानंतर आता नौपाडा पोलीस ठाण्यात पाच पेक्षा जास्तचा जणांचा जमाव करणे, तोंडा मास्क न लावणे आणि नियमांचे पालन न केल्याने शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेविका राधिका फाटक, मिनल संखे, विकास रेपाळे आणि ३० ते ४० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर शिवसैनिकांना जमा होण्याबरोबरच रोखण्यात टाळाटाळ केल्याबद्दल महापालिका मुख्यालयात सुरक्षारक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणीही भाजपने महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आता कर्तव्यात कसुर करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. या संदर्भात सुरक्षा अधिकाऱ्यांना ते सुरक्षारक्षक कोण कोण आहेत, त्यांच्याकडून ही चुक कशी झाली याची माहिती मागविण्यात आली असून त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -