घररायगडकर्जत नगर परिषदेत नगराध्यक्ष विरुद्ध मुख्याधिकारी शीतयुद्ध?

कर्जत नगर परिषदेत नगराध्यक्ष विरुद्ध मुख्याधिकारी शीतयुद्ध?

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून नगर परिषदेत नगराध्यक्ष विरुद्ध मुख्याधिकारी शीतयुद्ध सुरू असल्याची जोरदार खमंग चर्चा नागरिकांसह, सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नगर परिषदेत नगराध्यक्ष विरुद्ध मुख्याधिकारी शीतयुद्ध सुरू असल्याची जोरदार खमंग चर्चा नागरिकांसह, सोशल मीडियावर सुरू झाली आहे. नगराध्यक्षा स्वतःचे म्हणणे खरे करत मुख्याधिकार्‍यांंना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नसल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे. आता तर थेट मुख्याधिकार्‍यांनीच आपल्याला नगराध्यक्षांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप केल्याने या दोघांच्या वादात शहराचा विकास रखडणार की काय, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.

अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला गेला होता म्हणून मुख्याधिकार्‍यांना त्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक होते. परंतु नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी मुख्याधिकार्‍यांना विश्वासात आणि सोबत घेऊन चालावे, जेणेकरून विकास कामे करता येतील.
– महेंद्र थोरवे, आमदार, कर्जत-खालापूर

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी नगर परिषद हद्दीतील ललानी नगरमध्ये महानगर गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. अटी-शर्तीप्रमाणे काम सुरू नसल्याचे नगर परिषदेचे म्हणणे होते. हे काम रोखण्यासाठी अधिकारी, नगरसेवक गेले त्यावेळी काही कारणास्तव मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांना त्या ठिकाणी हजर राहता आले नाही या संधीचा फायदा घेत नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी नागरिकांसमोर दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून, अधिकार्‍यांना वैठीस धरण्याचे काम करीत असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.

मी नगर परिषदेमध्ये कळविले होते. मात्र तरी देखील नगराध्यक्षा जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे का आणि कशासाठी, याचा खुलासा झाला पाहिजे.
-डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद

- Advertisement -

पाटील यांनी काही कारणास्तव काही दिवस रजेवर होते. नगर परिषद हद्दीतील व्यायाम शाळेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम होत असल्याचा मुद्यावर तारांकित प्रश्न विधीमंडळात उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे त्या ठिकाणी हजर राहणे क्रमप्राप्त होते, तसे पत्र काढण्यात आल्याचा खुलासा पाटील यांनी त्यांच्या गैरहजेरीबाबत दिला. मात्र नगराध्यक्षा जोशी यांनी शहानिशा न करता परस्पर दबावतंत्र टाकण्याचे काम केल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, याबाबत प्रतिक्रियेसाठी नगराध्यक्षा जोशी यांच्याशी वारंवार संपर्क करूनही तो झाला नाही.

जसे मुख्याधिकारी ’मॅट’मधून जाऊन आले तसे नगर परिषदेमधून त्रास देणे सुरू आहे. त्यांच्याकडून शासकीय वाहन काढून घेतले आहे. कार्यक्रम पत्रिकेत नियमाप्रमाणे नावाचा उल्लेख केला जात नाही, तर जे कार्यक्रम राबविले जाते त्यामध्येही डवलण्याचा काम केले जात आहे. मुख्याधिकार्‍यांवरच जर अन्याय केला जात असेल तर सर्वसामान्यांना कुठून दाद मिळणार, अशी चर्चा सुरू आहे.

वैयक्तिक राजकारण न करता जनतेच्या हिताचा विचार करून विकासकामांवर भर दिला पाहिजे. संविधानाने जे अधिकार दिले आहेत त्या अधिकाराचा वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे. नगराध्यक्षा आणि मुख्याधिकार्‍यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडविले पाहिजेत.
-अ‍ॅड. कैलास मोरे, कर्जत

(ज्योती जाधव – लेखक कर्जत भागातील वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

IND vs ENG : तिसऱ्या टी-२० सामन्यात राहुलला डच्चू, रोहित शर्माचे पुनरागमन? 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -