घरक्राइमSafexpay out कंपनीचे Software हॅक ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Safexpay out कंपनीचे Software हॅक ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

रियाल इंटरप्राईजेस यांच्या वाशी व बेलापूर येथील कार्यालयात जाऊन तपास केला असता या ठिकाणी विविध बँक खाते व विविध करारनामे प्राप्त करण्यात आले.

ठाणे : अज्ञात व्यक्तिने Safexpay out कंपनीचे Software हॅक करुन 25 कोटी रुपयांचा फ्रॅाड केल्याने Safexpay कंपनीच्या लीगल Adviser मनाली साठे यांच्या तक्रारीवरून श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर सेल ठाणे मार्फत करणयात येत आहे.(Software hack of Safexpay out company A crime has been filed against the unknown)

गुन्ह्याचा तपास करत असताना असे आढळुन आले की, 25 कोटी फसवणुकीच्या रकमेपैकी 1,39,19,264 एवढी रक्कम ही रियाल इंटरप्राइजेसच्या नावे असलेल्या HDFC बॅंक खातेमध्ये वळती झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. रियाल इंटरप्राइजेसच्या गोपनीय माहितीवरुन तपास केला असता त्यांचे कार्यालय वाशी व बेलापूर, नवी मुंबई येथे असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

रियाल इंटरप्राईजेस यांच्या वाशी व बेलापूर येथील कार्यालयात जाऊन तपास केला असता या ठिकाणी विविध बँक खाते व विविध करारनामे प्राप्त करण्यात आले. प्राप्त करारनाम्यापैकी नौपाडा पोलीस ठाणे यांच्या हद्दीमध्ये बालगणेश टावर स्टेशन रोड ठाणे या पत्त्यावर विविध व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे पाच भागीदारी संस्था स्थापन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा : IND vs AUS: विश्वचषकात भारताची विजयी सलामी; तगड्या कांगारूंना लोळवले

- Advertisement -

तब्बल 260 बॅंक खात्यातून झाला व्यवहार

रियाल कंपनीचे कामगार यांचेकडे तपास करत असतांना जवळपास 260 बॅंक खाते व विविध नोटराईज्ड भागीदारी करारनामे आढळून आले. या बॅंक खात्याबाबत माहीती प्राप्त केली असता त्यामध्ये अंदाजे 16 हजार 180 कोटी 41 लाख 92 हजार 497 रूपयांची आर्थिक उलाढाल केली असल्याचे आढळून आले. तसेच या रकमेपैकी काही रक्कम परदेशात पाठविल्याचे दिसून आले आहे. या बाबतची माहीती डी.जी इन्वेस्टीगेशन (मुंबई) यांना देण्यात आलेली आहे.

हेही वाचा : अरेच्चा! तिकीट विक्री तर झाली पण स्टेडिअम रिकामे; INDvsAUS सामन्यातील चित्र

यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला गुन्हा

अशा प्रकारे विविध अनोंदणीकृत भागीदारी फर्मचे नावे विविध व्यक्तींच्या नावे बॅंक खाती उघडून खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याने आरोपीनामे संजय सिंग, अमोल आंधळे उर्फ अमन, केदार उर्फ समीर दिघे, जितेंद्र पांडे, नविन व इतर यांचे विरोधात याप्रकरणी सरकारतर्फे नौपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून,16 हजार 180 कोटी 41 लाख 92 हजार 497 रक्कम ही विविध खात्यांमधील उलाढालींची रक्कम असल्याचे दिसून आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -