घरठाणेठाणे रेल्वे स्थानकातून धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस सुरु करा

ठाणे रेल्वे स्थानकातून धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस सुरु करा

Subscribe

खासदार राजन विचारे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांना गर्दीचा सामना करावा लागतो त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत असतात ते कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केलेल्या मागणीनुसार खासदार राजन विचारे यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्राद्वारे ठाणे वासियांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे हे श्रद्धास्थान असल्याने गणेशोत्सवासाठी (अनारक्षित) धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस ठाण्यातून सुरू करावी अशी मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे कि, सन २६ जानेवारी १९९८ रोजी प्राध्यापक मधु दंडवते यांच्या प्रयत्नाने भारतीय रेल्वेतील कोकण रेल्वे प्रकल्पातील रेल्वे मार्गावर मुंबई ते बेंगलोर अशी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा व पनवेल या स्थानकातून दैनंदिन कोकण रेल्वे सेवा अधिक सुरु करण्यात आल्या. कोकण वासियांसाठी यापूर्वी होणारा एसटीचा प्रवास कमी होऊन कालांतराने रेल्वेने प्रवास अधिक वाढू लागला.

तसेच पर्यटकांची गर्दी कोकणात अधिक वाढू लागल्याने कोकणवासीयांना जागा आरक्षित मिळत नाही याचा विचार करून खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहरात कोकण वासियांची संख्या अधिक असल्याने ठाणे हे केंद्रबिंदू असल्याने ठाणे रेल्वे स्थानकातून ही रेल्वे सेवा गणेश उत्सवाच्या तीन दिवस आधी म्हणजे १६ सप्टेंबर २०२३ पासून व विसर्जनाच्या तीन दिवस नंतर म्हणजे १ ऑक्टोबर २०२३ रोजी ठाणे ते थिविम व थिविम ते ठाणे अशी अनारक्षित धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस ठाणे रेल्वे स्थानकातून सुरू करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -