घरठाणेदिव्यांगासाठीचा निधी खर्च न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा

दिव्यांगासाठीचा निधी खर्च न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा

Subscribe

दिव्यांग संघटनांची मागणी

ठाणे । ठाणे महानगर पालिका शहरभर अनावश्यक रंगरंगोटी करीत आहे. मात्र, दिव्यांग विकास निधीचा विनियोग करण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप करीत सन 2023-24 चा दिव्यांग विकास निधी तत्काळ दिव्यांगांच्या उत्थानासाठी खर्च करण्यासाठी आदेश द्यावेत तसेच हा निधी खर्च न करणार्‍या अधिकार्‍यांवर दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 नुसार कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय दिव्यांग सेनेने दिव्यांग कल्याण आयुक्त प्रविण पुरी यांची भेट घेऊन केली.

अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त प्रविण पुरी यांची पुणे येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळेस त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राज्य तथा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्याबाबत मक्तीचे करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात केंद्रीय स्तरावर कायद्याची निर्मिती करण्यात आलेली असून त्या अंतर्गत एकूण अर्थसंकल्पाच्या 5 टक्के निधी हा दिव्यांगांच्या कल्याणार्थ वापरावा, असे सक्त निर्देश आहेत. तसेच, या निधीचा विनियोग करणेसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून सूचनाही करण्यात येत असतात. मात्र, ठाणे महानगर पालिकेच्या वतीने राखीव ठेवलेल्या निधीचा योग्य पद्धतीने विनियोगच करण्यात येत नाही. सन 2022-2023 मध्ये दिव्यांगांच्या विधीचा विनियोग दिव्यांगांसाठी करण्यात न आल्याने तो निधी इतरत्र वर्ग करण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी उपरोक्त संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात निधी खर्च करण्यात आला होता. यंदादेखील असाच प्रकार झाल्याचा आरोप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -