घरठाणेThane : कळवा रुग्णालय मृत्यूप्रकरण; दोन अधिकारी निलंबित तर 'इतक्या' जणांवर टांगती...

Thane : कळवा रुग्णालय मृत्यूप्रकरण; दोन अधिकारी निलंबित तर ‘इतक्या’ जणांवर टांगती तलवार

Subscribe

ठाणे : महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) सलग दोन दिवसांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीकडून आता दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, तर चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. (Thane Kalwa Hospital Death Case Two officers are suspended while 4 hang sword)

हेही वाचा – Sunil Kedar यांची आमदारकी रद्द; नाना पटोले यांनी भाजपावर साधला निशाणा

- Advertisement -

13 आणि 14 ऑगस्ट 2023 रोजी कळवा रुग्णालयात 18 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. एकाचवेळी 18 रुग्ण दगावल्यामुळे कळवा रुग्णालायामधील प्रशासनावर ठपका ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर एक कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीमध्ये महाराष्ट्र स्वास्थ विभाग आयुक्त ठाणे जिल्हाधिकारी तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्त आरोग्य सेवानिर्देशक मुंबई सहाय्यक निर्देशक आधी अधिकारी होते. कमिटीने लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही कळवा रुग्णालयातील मृत्यूकांडाचा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

शासनाकडून तयार करण्यात आलेल्या कमिटीच्या माध्यमातून जबाबदार डॉक्टरांकडून घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची कारणे विचारण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात आता दोन डॉक्टरांचे निलंबण करण्यात आले आहे. कारण सर्व प्रकरणाची विचारणा करण्यात आलेले डॉक्टर हे कळवा रुग्णालयातील शिकावू डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे तसेच त्याठिकाणी काम देखील करतात. ज्यावेळी रुग्णांचे मृत्यू झाले, त्यावेळी निलंबित करण्यात आलेले डॉक्टर हे वॉर्डमध्ये उपस्थित नव्हते आणि त्यांनी दिलेल्या उत्तरामध्ये आयुक्तांना त्यांची बाजू कळली नाही, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Salim Kutta : “राऊतांच्या आरोपाला उत्तर देण्याएवढा माझा…”, Fadnavis यांचा टोला

चार डॉक्टरांवर निलंबणाची टांगती तलवार

कळवा रुग्णालयातील मृत्यूकांडाचे प्रकरण अधिवेशनामध्ये गाजले होते. त्यावेळी विरोधी पक्षाच्यावतीने रुग्णालयाचे अधीक्षक राजेश बरोट आणि त्यांचे मेडिसिन डिपार्टमेंट अनिरुद्ध माळगावकर व इतर दोन ज्युनिअर डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे आता चौकशी समितीकडून या चार डॉक्टरांनी लवकरात लवकर नोटीस पाठवली जाणार अशी, माहिती समजते. त्यामुळे आता 18 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी कळवा रुग्णालायतील दोन वरिष्ठ अधिकारी आणि दोन ज्युनिअर डॉक्टर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -