घरठाणेपालखी नृत्य स्पर्धेत निनावीदेवी पथकाने मारली बाजी

पालखी नृत्य स्पर्धेत निनावीदेवी पथकाने मारली बाजी

Subscribe

ठाणे । कळवा येथील भूमिपूत्र मैदान, खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपारिक प्रकारे रविवारी साजरा करण्यात आला होता. या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेवून आणण्यात आली होती. या अनुषंगाने आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत श्रीदेवी वाघजाई पालखी नृत्य पथक ऊक्षी, ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी, आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरी, पदमावती मार्गताम्हाणे गुहागर जय त्रिमुख मठ लांजा, श्री देव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर, साडवली श्री देवी वाघजाई साडवली संगमेश्वर येगांव चिपळूण, कुशिवडे काळकाई चिपळूण, नागेश्वर रत्नागिरी या पथकांनी भाग घेतला होता. शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही पालखी नृत्यात सहभाग घेतला.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचरी या पथकास दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय विजेत्या गंगोबा नृत्य पथक, करंबळे या पथकास एक लाख एकावन्न हजार रुपये आणि आकर्षक चषक, तृतीय विजेत्या कालकाई पालखी नृत्य पथकास एक लाख एक हजार रुपये आणि आकर्षक चषक तासेच सर्व सहभागी संघाना प्रत्येकी 25 हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -