घरठाणेटिटवाळ्यात २२५ रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा बडगा

टिटवाळ्यात २२५ रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा बडगा

Subscribe

रेल्वे कायद्यांतर्गत कारवाई, आरपीएफची विशेष तपास मोहीम

कल्याण । टिटवाळा आरपीएफने विशेष मोहिमेअंतर्गत आठ दिवसांत २२५ प्रवाशांवर कारवाई केली आहे. पकडलेल्या प्रवाशांमध्ये लेडीज कंपार्टमेंट, सामान आणि अपंग डब्यातून प्रवास करणारे आणि रुळ ओलांडणार्‍यांचा समावेश आहे. टिटवाळा आरपीएफ स्टेशन प्रभारी अरुण कुमार पांडे यांनी सांगितले की, आरपीएफ वरिष्ठ डीएससी ऋषी कुमार शुक्ला यांच्या सूचनेनुसार कल्याणचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त टी. रामचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली एक ते ८ एप्रिल २०२४या कालावधीत सखोल तपासणी मोहीम राबवण्यात आली.

ज्यामध्ये २२५ प्रवाशांवर कारवाई करीत अटक करण्यात आली. या तपासणी मोहिमेत टिटवाळा आरपीएफ पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुणकुमार पांडे, उपनिरीक्षक बी.के.ओझा, सहायक उपनिरीक्षक भूषण मराठे, सहायक उपनिरीक्षक अंजू कुमार, महिला हेड कॉन्स्टेबल दीपाली जावकर, माधुरी अंबुरे आणि न्यायालयाचे निवेदक मनोज यादव यांचा सहभाग होता. टिटवाळा आरपीएफ तर्फे पोलीस स्टेशन प्रभारी पांडे यांनी सांगितले की, पकडलेल्या सर्व प्रवाशांवर रेल्वे कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -