घरपालघरबांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू

बांधकामाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Subscribe

हे बांधकाम अनधिकृत असून त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसिलदारांकडे तक्रार केली ,असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

वसई: वसई पूर्वेच्या पोमण येथे अनधिकृत गोदामाचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. नायगाव पूर्वेच्या साष्टीकर पाडा येथे एका अनधिकृत गोदामाचे बांधकाम सुरू होते. यावेळी ११ मजूर काम करत होते. अचानक गोदामाची भिंत कोसळली. या दुर्घटनेत दोन कामगार ढिगार्‍याखाली कोसळले. त्यामध्ये आकाश टिकोरीलाल गौतम (२१) या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याचा चुलत भसियानंद गौतम हा जखमी झाला. त्याच्यावर सातिवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी नायगाव पोलिसांनी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदार प्रभू कडव याने कामगारांना कुठल्याही सुरक्षेची साधने पुरवली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर नायगाव पोलीस ठाण्यात कलम ३०४ अ, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बांधकाम अनधिकृत असून त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसिलदारांकडे तक्रार केली ,असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -