घरट्रेंडिंगजेव्हा अर्जुन तेंडुलकर मैदानातच झोपतो

जेव्हा अर्जुन तेंडुलकर मैदानातच झोपतो

Subscribe

भारताचा सध्या इंग्लंड दौरा सुरू असून भारतीय संघाला काही खास कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या कसोटीतही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र सोशल मीडियावर मॅच किंवा संघातील खेळाडूंपेक्षा जास्त चर्चेत आहे तो भारताचा अंडर १९ संघातील खेळाडू आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. कधी पावसादरम्यान मैदानाची देखभाल करणाऱ्या ग्राउंड स्टाफची मदत करतानाचा अर्जुन तर कधी लॉर्ड्स मैदानाबाहेर चक्क रेडिओ विकनारा अर्जुनचा आता एक नवीनच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून फोटोत अर्जुन चक्क बाउंड्रीलाइनवर असणाऱ्या जाहीरातींच्या फलकामागे जाऊन झोपला आहे.

- Advertisement -

अर्जुन सोशल मीडियावर सतत चर्चेत

अर्जुनने गेल्या महिन्यातच श्रीलंकेविरूद्ध भारताच्या अंडर १९ संघात टेस्ट क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले. सध्या तो भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असून गेले काही दिवस तो सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. सर्वात आधी ग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियलसोबतचा लंचवरील फोटोमुळे तर त्यानंतर लॉर्ड्सवर पावसादरम्यान मैदानाची देखभाल करणाऱ्या ग्राउंड स्टाफची मदत केल्यामुळे अर्जुन चर्चेत आला. त्यानंतर भारताचा खेळाडू हरभजनने आपल्या ट्विटर हँडलवरून आपला आणि अर्जुनचा एक फोटो पोस्ट केला त्यात अर्जुन रेडिओ विकताना दिसून येत होता. त्यानंतर आता अर्जुन चक्क लॉर्ड्स मैदानाच्या बाउंड्रीलाइनवर असणाऱ्या जाहीरातींच्या फलकामागे झोपला असल्याचा फोटो व्हायरल होत आहे.

वाचा – अर्जुन तेंडुलकरने लॉर्ड्सवर काढले रेडिओ विकायला!

क्रिकेटमधील देव मानला जाणाऱ्या सचिनच्या चाहत्यांना आता अर्जुनकडून बऱ्याच अपेक्षा असून सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा अर्जुन भविष्यात मैदानावर कशी कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

वाचा – कोहलीला प्रपोज करणारी डॅनियल अर्जुन तेंडुलकरसोबत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -