घरट्रेंडिंगबीअरविषयी बोलू काही! आज आंतराष्ट्रीय बीअर दिन

बीअरविषयी बोलू काही! आज आंतराष्ट्रीय बीअर दिन

Subscribe

आज आंतरराष्ट्रीय बीअर दिन आहे. त्यानिमित्ताने आपण जाणून घेऊयात बीअरचे फायदे, बीअर कशी तयार केली जाते आणि बीअरच्या प्रकारांबाबत.

जगभरात ३ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय बीअर दिन (International Beer Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरात मोठ्या प्रमाणात लोक अल्कोहोलिक आहेत. अल्कोहोलिक लोक बीअरलाच सर्वाधिक पसंती देतात. त्यामुळे मद्यपींसाठी आजच्या दिवसाचे विशेष महत्व आहे. जगभरातले सर्व मद्यपी आजचा दिवस आवडती बीअर पिऊन साजरा करतात. इतर प्रकारच्या मद्यांपेक्षा बीअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. त्यामुळे बीअरचे चाहते अधिक आहेत. बीअर ही मादक असली, तरी ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असा अनेकांचा समज आहेच शिवाय काही संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून हे या आधीच सिद्ध झाले आहे.

कशी तयार होते बीअर?

बीअर बनवण्यासाठी चार प्रमुख घटकांची आवश्यकता असते. पाणी,सातू / जव/ गहू, हॉप्स आणि यीस्ट या चार घटकांपासून बीअर तयार केली जाते. बीअर चार टप्प्यांमध्ये तयार केली जाते. माल्ट बनविणे, वर्ट (मॅश) बनवणे, किण्वन प्रक्रिया आणि मुरवणे. या चार टप्प्यांमध्ये बीअर तयार केली जाते. बीअर बनवण्याची सुरूवात माल्ट आंबवून केली जाते. माल्ट तयार करण्यासाठी गहू, सातू, मका किंवा तांदळाचा वापर केला जातो. धान्याला हलके मोड येऊ दिले जातात. त्यानंतर धान्य ३० तास भट्टीत भाजले जातात. तयार झालेले माल्ट दळले जातात. माल्ट दळल्यानंतर तयार झालेले पीठ गरम पाण्यात लापशीसारखे शिजवले जाते. त्यानंतर त्यातल्या साखरेचे प्रमाण कमी केले जाते. त्यानंतर याला उकळले जाते. दरम्यान त्यामध्ये हॉप मिसळतात, ज्यामुळे बिअरला ती विशिष्ट कडू चव येते. त्यानंतर बीअर मुरू दिली जाते. बीअर मुरायला ठेवल्यानंतर त्यामधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. त्यामुळे बीअर स्वच्छ दिसते. बीअर ६ ते ८ महिने टिकते.

- Advertisement -

 

बिअरचे विविध प्रकार

बिअरचे अनेक प्रकार आहेत. फिकट किंवा गडद रंगाची, गोड किंवा कडू चवीची बीअर आपल्याला पहायला मिळते. आपल्याला सातू किंवा गव्हापासून बनवलेली बीअर प्यायला मिळेल. पाणी, माल्ट, तंत्र आणि प्रक्रियेत वापरलेले यीस्ट यानुसार बिअरला वेगवेगळी चव प्राप्त होते.

- Advertisement -
beer
बीअर

बीअरबाबत अजून थोडं

बीअरमध्ये ९० टकके पाणी असते. बीअरसाठी मिनरल वॉटरची आवश्यकता असते. बीअर तयार करताना वापरले जाणारे हॉप्स म्हणजे वेलीवर वाढणारी एक प्रकारची फुले आहेत. यामुळे बीअर खूप काळ टिकते. तसेच या फुलांमुळे बीअरला कडवट चव येते.

बीअरचे फायदे

बीअर प्यायल्याने हृदय रोग होण्याची शक्यता ४० टक्के कमी होऊ शकते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
बीअर प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या कमी होते. किडनी स्टोनचा त्रास असणारे अनेक जण बीअर पितात.
बीअरमध्ये फायबर असल्याने पचनशक्ती सुधारते
(सर्वसाधारणपणे हे फायदे लोक सांगतात)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -