आता थेट पंतप्रधान कार्यालयात करता येणार तक्रार, कसे ते जाणून घ्या

सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण देखील सरकारी कार्यालयात केले जात नाही मात्र आता केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या तक्रारीसाठी नवा मार्ग आणला आहे.

PM-Narendra-Modi

सरकारी काम आणि वर्ष भर थांब, असे अनेक वेळा म्हटले जाते. सरकारी काम म्हटले की ते केव्हा पूर्ण होईल हे सांगता येत नाही. सामान्य नागरिकांना अनेक वेळा सरकारी कार्यलयाच्या पायऱ्या तुडवाव्या लागतात. मात्र तरी देखील कोणीही दखल घेत नाहीत. केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना सुरू केल्या मात्र त्या फार कमी लोकांपर्यत पोहचून त्याचा सर्वसामान्यांना लाभ मिळाला. सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण देखील सरकारी कार्यालयात केले जात नाही मात्र आता केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या तक्रारीसाठी नवा मार्ग आणला आहे. सर्वसामान्य नागरिक आता थेट पंतप्रधान कार्यालयात (Prime Minister Office)  आपल्या तक्रारी दाखल करू शकतात. एक छोटी ऑनलाईन प्रक्रिया करुन तुमची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात दाखल करू शकता. ही तक्रार कशी करायची जाणून घ्या.

पंतप्रधान कार्यालयात ऑनलाइन तक्रार कशी करायची?

  • पहिल्यांदा www.pmindia.gov.in\en या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर Drop down मेन्यूमधील Interact With PM या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढे Write to the Prime Minister हा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा.
  • तुमची जी तक्रार असले ती तक्रार तिथे टाईप करा.
  • तक्रार टाईप केल्यानंतर CPGRAMS पेज समोर येईल त्यावर तक्रार दाखल करा.
  • तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल.
  • त्यानंतर तुम्ही केलेल्या तक्रारीसंबंधी कागदपत्रे अपलोड करा. सर्व माहिती भरल्यानंतर तुमची तक्रार नोंदवून घेण्यात येईल.

पंतप्रधान कार्यालयात तक्रार करण्याची ऑफलाईन पद्धत काय?

पंतप्रधान कार्यलयात तक्रार करण्यासाठी ऑनलाईन पद्धत वापरायची नसल्यास ऑफलाईन पद्धतीने देखील तक्रार दाखल करता येईल. पंतप्रधान कार्यलयाला पोस्टाद्वारे तुम्ही तक्रार करू शकता. त्यासाठी पंतप्रधान कार्यालय,साऊथ ब्लॉक,नवी दिल्ली – ११००११ या पत्यावर पत्र पाठवू शकता . त्याचप्रमाणे ०११-२३०१६८५७ या फॅक्स नंबरवर फॅक्स देखील करू शकता.


हेही वाचा – E-Shram Portal: मोदी सरकार ३८ कोटी लोकांना देणार मोठी भेट; वाचा सविस्तर