घरट्रेंडिंगDFCCIL Application 2021: रेल्वे मंत्रालयाच्या 'या' कंपनीत १०७४ जागांकरता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ,...

DFCCIL Application 2021: रेल्वे मंत्रालयाच्या ‘या’ कंपनीत १०७४ जागांकरता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, वाचा सविस्तर

Subscribe

रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेल्या सरकारी कंपनीत सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) या रेल्वे मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने १ हजार ०७४ कनिष्ठ कार्यकारी, कार्यकारी आणि कनिष्ठ व्यवस्थापक यांच्या विविध विभागांतील पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दोन महिन्यांसाठी वाढविली आहे. या कंपनीने मंगळवारी १८ मे २०२१ रोजी जारी केलेल्या नोटीस नुसार या पदांसाठी भरती करण्यास इच्छुक उमेदवार आता २३ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ मे अशी होती. दरम्यानस, डीएफसीसीआयएल भरती २०२१ च्या अर्जाची भऱण्याची प्रक्रिया २४ एप्रिल २०२१ पासून सुरू झाली आहे.

डीएफसीसीआयएलने जारी केलेल्या नोटीसनुसार देशभर पसरलेल्या कोरोनाच्या गंभीर परिस्थिती आणि प्रतिबंधासाठी देशाच्या विविध भागात लावलेले लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हे लक्षात घेता १०४७ पदांसाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासह, डीएफसीसीआयएलने आता निवड प्रक्रियेनुसार घेण्यात येणारी संगणक आधारित चाचणी (सीबीटी) सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ही परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

- Advertisement -

क्लिक करा बघा नोटीस

या पदांसाठी होणार भरती

ज्यूनिअर मॅनेजर (सिव्हिल) – ३१ पदे.
ज्यूनिअर मॅनेजर (ऑपरेशन्स आणि बीडी) – ७७ पदे.
ज्यूनिअर मॅनेजर (मेकॅनिकल) – ३पदे.
एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल) – ७३ पदे.
एक्झिक्युटिव्ह (विद्युत) – ४२ पदे.
एक्झिक्युटिव्ह (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) – ८७ पदे.
एक्झिक्युटिव्ह (ऑपरेशन्स आणि बीडी) – २३७ पदे.
एक्झिक्युटिव्ह (यांत्रिकी) – ३ पदे.
ज्यूनिअर एक्झिक्युटिव्ह (विद्युत) – १३५ पदे
ज्यूनिअर एक्झिक्युटिव्ह (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) – १४७ पदे
ज्यूनिअर एक्झिक्युटिव्ह (ऑपरेशन्स आणि बीडी) – २२५ पदे
ज्यूनिअर एक्झिक्युटिव्ह (यांत्रिकी) – १४ पदे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -