घरट्रेंडिंगBRAVO, माणसं नव्हे चक्क अजगरच करतात बॉडी मसाज! कधी केलाय का असा...

BRAVO, माणसं नव्हे चक्क अजगरच करतात बॉडी मसाज! कधी केलाय का असा मसाज?

Subscribe

मसाज केल्याने संपूर्ण शरीराला फायदा मिळतो. तुम्हाला रिलॅक्स वाटते आणि अनेक शारिरीक समस्या दूर होतात. पण तुम्ही कधी ‘स्नेक मसाज’ म्हणजेच सापाच्या माध्यमातून मसाज केला आहे का? तुम्ही म्हणालं सापाकडून मसाज करणे एवढी कोणाची हिम्मत असले. पण हे सर्व सत्य आहे. इजिप्ततील मिस्नमधील एका स्पा सेंटरमध्ये लोकांना स्नेक (साप) मसाज दिला जात आहे. यामुळे शरीराला खूप आराम मिळतो आणि दुखणं देखील कमी होतं, असा दावा केला गेला आहे.

राजधानी कैरो येथील एका स्पा सेंटरमध्ये अनेक प्रकारे लोकांचा मसाज केला जात आहे. यामध्ये ‘स्नेक मसाज’ हा ऑप्शन देखील आहे. या स्नेक मसाजमध्ये विषारी नसलेल्या सापाचा वापर केला जातो. यामध्ये जीवित सापांना लोकांना पाठीवर आणि चेहऱ्यावर सोडले जाते. यामुळे लोकांच्या शरीरामध्ये असलेले दुखणे दूर होते.

- Advertisement -

रॉयटर्स या न्यूज एजन्सीच्या व्हिडिओनुसार, मसाज घेणाऱ्या व्यक्तीवर पहिल्यांदा तेल लावले जाते. नंतर ३० मिनिटे मसाज केला जातो. यादरम्यान अजगर आणि जवळपास २० विविध बिनविषारी सापाचे प्रकार शरीरावर सोडले जातात. या ‘स्नेक मसाज’चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या स्पा सेंटरचे मालक सफवत सेडकीने सांगितले की, ‘स्नेक मसाजमुळे स्नायू आणि गुडघ्याचे दुखणे कमी होते. शिवाय शरीरात रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.’

- Advertisement -

हेही वाचा – Viral Photo: ‘या’ देशात -45℃ तापमान!, हवेतच नूडल्स अन् अंड गोठलं!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -