घरट्रेंडिंगFix Deposit: एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जाणून घ्या विविध बँकेचे व्याजदर

Fix Deposit: एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जाणून घ्या विविध बँकेचे व्याजदर

Subscribe

एफडीमध्ये गुंतवणूक करत असाल तर सगळ्या बँकांचे व्याजदर पाहूनच गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेऊ शकता

गुंतवणूक करण्यासाठी अनेक लोकं फिक्सड डिपॉझिटचा पर्याय निवडत असतात. बँकेत केलेली एफडी ही नेहमीच सुरक्षित असते. परंतु कोणत्या बँकेत आपण एफडी केली तर चांगला परतावा मिळेल याचा माहिती करुण घेणं गरजेचे आहे. फिक्सड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्याक कर्ज आणि इतर सुविधांचा लाभ होतो त्यामुळे ग्राहकांचा फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचा कल अधिक आहे. एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध बँकेचे व्याजदर जर तुम्हाला माहिती असेल तर अधिक परतावा मिळणाऱ्या बँकेत तुम्ही एफडी करण्यास अधिक प्राधान्या देऊ शकता यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल.

आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार एफडीचा व्याजर ठरवण्यात येत असतो. कोरोना काळात भँकेच्या व्याजदरात बदल झालेला तुम्ही पाहिला आहे. कोरोना संकटामुळे सगळ्या बँकांनी आपल्या व्यादरात बदल केला आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या धोरणात रेपो रेट, आर्थिक स्थितीत आणि कर्जमागणीत काही बदल केले तर याचा परिणाम एफडीमध्ये होत असतो. तुम्ही जर एफडीमध्ये गुंतवणूक करत असाल तर सगळ्या बँकांचे व्याजदर पाहूनच गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेऊ शकता.

- Advertisement -

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही एफडी करत असाल तर तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. कारण एसबीआयमध्ये एफडीच्या ३ ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला ५.४ टक्के व्याजदर मिळू शकतो तसेच या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ५० बीपीएस व्याजदर मिळते. एसबीआयमध्ये ४६ दिवसांपासून ते १७९ दिवसांपर्यंतही एफडी करु शकता यावर आपल्याला ३.९ टक्के व्याज मिळेल तसेच १८० दिवस ते १ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ४.४ टक्के व्याज एसबीआयमध्ये मिळेल.

एचडीएफसी बँक

एफडीमधील व्याजदराच्या तुलनेत इतर बँकांपेक्षा एचडीएफसी बँक १० वर्ष गुंतवणूकीच्या कालावधीवर जास्त व्याज दर देते. १० वर्षांच्या एफडीवर एचडीएफसी बँकेत ५.५ टक्के व्याजदर मिळेल. विशेष म्हणजे तुम्हाला जर ७ ते १४ दिवसांसाठी एफडी करायची असेल तर तुम्हाला यावर २.५ टक्के व्याज मिळेल. सर्व बँकेच्या तुलनेत एचडीएफसीमध्ये अधिक व्याज मिळत आहे.

- Advertisement -

अॅक्सिस बँक

अॅक्सिक बँकेत ज्येष्ठ नागरिकांना मॅच्युरिटी पिरियडच्या आधारावर व्याज दिले जात आहे. १० वर्षांच्या एफडी कालावधीवर ५.५० टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकले. याचा सामान्य लोकांना चांगला फायदा मिळतो आहे. ७ दिवसांपासून अगदी १० वर्षांच्या कालावधीसाठी २.५ ते ५.५० टक्के एवढे व्याज ग्राहकांना मिळू शकते.

कोटक बँक

कोटक बँकेत ग्राहकांना ७ ते १० वर्षांच्या कालावधीवर २.५ ते ५.३० टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते.

पंजाब नॅशनल बँक

जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेत १ वर्षांच्या कालावधीसाठी ५.१० टक्के व्याजदर मिळतो आहे. तसेच ३ ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास ग्राहकांना ५.२५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -