घरट्रेंडिंगघराबाहेर न पडताही कोरोनाची लागण कशी होते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' कारण

घराबाहेर न पडताही कोरोनाची लागण कशी होते? डॉक्टरांनी सांगितले ‘हे’ कारण

Subscribe

मी घराबाहेर पडलो नाही, कोणाच्या संपर्कात आलो नाही तरीही मला कोरोनाची लागण कशी झाली? असे अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. यामागचे नेमकं कारण दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या लक्षणांमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना आधी कोरोना झालाय त्यांनाही पुन्हा कोरोनाची लागण होत आहे. बरेच जण घरी आहेत. घराचा उंबरठाही ओलांडला नाही तरीही त्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. मी घराबाहेर पडलो नाही, कोणाच्या संपर्कात आलो नाही तरीही मला कोरोनाची लागण कशी झाली? असे अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. यामागचे नेमकं कारण दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून हवेतून कोरोना व्हायरसचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. घरी राहून सर्व प्रकारची काळजी घेऊनही कोरोनाची लागण होण्यामागे हे महत्त्वाचे कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

एखादा कोरोनाबाधित रुग्ण शिंकला किंवा खोकला तर त्याच्या शिंकण्या व खोकल्यातून ड्रॉपलेट्स पृष्ठभागावर पडतात. त्या पृष्ठभागावर विषाणू काही काळ जिवंत राहतो. त्या ठिकाणी आपला स्पर्श झाल्यास कोरोना विषाणू संक्रमित होतो. मात्र आता हवेतूनही कोरोनाचे संक्रमण होत असल्याचे समोर आले. हा विषाणू हवेत जास्त काळ टिकू राहत आहे. त्यामुळे तुम्ही घरी असलात तरी तुमच्या आजूबाजूला २ मीटरवर एखादी व्यक्ती शिंकली, खोकली तर विषाणूचा संसर्ग तुम्हाला होऊ शकतो, असे डॉक्टर गुलेरिया यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितल्याप्रमाणे, तुम्ही घराचा उंबरठाही ओलांडला नाही परंतु तुमच्या घरी बाहेरुन माणसे येत असतील तर त्यांच्यामार्फतही तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. बाहेरुन घरात येणारी व्यक्ती जरी पॉझिटिव्ह नसली तरी ती कोरोना विषाणूची वाहक असू शकते,असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर हवेतील कोरोनापासून होणाऱ्या संसर्गापासून स्वत:ला दूर ठेवायचे असेल तर घरात हवा खेळती ठेवा. कोरोनासाठी दिलेल्या नियमांचे पालन करा.


हेही वाचा – Proning: कोरोनाबाधितांना श्वास घेण्यास अडचण? कमी होतेय ऑक्सिजन पातळी?; आरोग्य मंत्रालयाने सुचविले घरगुती उपचार

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -