घरCORONA UPDATEडबल मास्क कसा वापरावा?

डबल मास्क कसा वापरावा?

Subscribe

कोरोना महामारिच्या काळात डबल मास्क वापरणे हे सर्वांसाठी उत्तम ठरेल

देशात कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा तीव्र असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नवीन लक्षणे आणि कोरोनाचे नवीन प्रकार समोर आले आहेत. या महाभंयकर आजारापासून वाचवण्यासाठी मास्क लावणे गरजेचे आहे. मात्र आपण वापरत असलेला मास्क डबल मास्क असणे गरेजेचे आहे,असे तज्ज्ञांचे मत आहे. कोरोना महामारीच्या काळात डबल मास्क वापरणे हे सर्वांसाठी उत्तम ठरेल असे सांगण्यात येत आहे. मात्र हा डबल मास्क नक्की कसा वापरायचा? जाणून घ्या.

दोन फेस मास्क एकत्र करुन डबल मास्क तयार करता येऊ शकतो. त्यासाठी एका साइजचे दोन मास्क घेऊन ते चेहऱ्याला लावता येऊ शकतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना हा हवेमार्फत पसरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चेहऱ्याला डबल मास्क लावल्याने विषारी व्हायरसचे जंतू तोंडात जाण्यापासून मास्क आपले संरक्षण करतो.  ज्यामुळे आपण हवेतून पसरणाऱ्या कोरोना व्हायरसपासून सुरक्षा राहू शकतो.

- Advertisement -

कोरोनाबाधित असलेली व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर त्याचे ड्रॉपलेट्स हवेत काही काळ जिवंत राहतात. त्यामुळे आपण एखाद्या वस्तूला किंवा पृष्ठभागाला स्पर्श केल्यास आपल्याला संसर्ग होऊ शकतो. हेच ड्रॉपलेट्स आता हवेत पसरुन हवेच्या मार्फत कोरोना संसर्गाचा धोका असल्याचे समोर आले आहे. डबल मास्क घातल्यामुळे हवेतील व्हायरस श्वासाद्वारे आपल्या शरीरात जाणार नाही. त्यामुळेच अशा परिस्थितील डबल मास्क घालणे कधीही योग्य ठरेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

डबल मास्कचे फायदे

  • डबल मास्कमुळे कोरोनाच्या विषाणूपासून आपल्याला अधिक संरक्षण मिळेल.
  • डबल मास्कमुळे कोरोना विषाणू नाकाद्वारे शरीरात जाण्याची शक्यता कमी होईल.
  • सेंटर ऑफ डिसीज कंट्रोलने केलेल्या अभ्यासात डबल मास्कचा वापर केल्यामुळे आपल्याला कोरोना व्हायरसचा धोका ९५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

डबल मास्क कसा वापरायचा?

  • डबल मास्क वापरणे अगदी सोपे आहे. डबल मास्कसाठी आपल्याकडे एक सर्जिकल मास्क आणि एक कापडी मास्क असणे गरजेचे आहे.
  • आधी चेहऱ्यावर सर्जिकल मास्क लावा. त्यानंतर त्यावर कापडी मास्क लावून सर्जिकल मास्क व्यवस्थितपणे झाकून घ्या.
  • त्याचप्रमाणे तुम्ही कापडी मास्कवर थ्री प्ले मास्कही लावू शकता.
  • मास्क घेताना योग्य साइजचा मास्क घ्या. मास्क लुज असेल तर त्याचा उपयोग नाही.
  • सर्जिकल मास्क सर्वांच्याच चेहऱ्यावर फिट बसतात. त्यामुळे सर्जिकल मास्क आधी लावून त्यावर कापडी मास्क लावा. अशाप्रकारे डबल मास्कचा वापर करु शकता.

    हेही वाचा – ऑक्सिजनची कमतरता टाळण्यासाठी रोजच्या पौष्टिक आहारात काय गरजेचं ?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -