घरट्रेंडिंग'या' ग्रहावर वाहतात लाव्हा रसाच्या नद्या, ४०० हून अधिक सक्रिय ज्वालामुखी!

‘या’ ग्रहावर वाहतात लाव्हा रसाच्या नद्या, ४०० हून अधिक सक्रिय ज्वालामुखी!

Subscribe

आपल्या सौर मंडळातील सर्वात सक्रिय हा ग्रह आहे , म्हणजेच त्याच्या भूमीत नेहमीच कोणती न कोणती हालचाल होत असते.

आपल्या पृथ्वीवर सुमारे 1500 सक्रिय ज्वालामुखी असून पृथ्वीवर असणाऱ्या या ज्वालामुखी कधी कधी उसळण्याची देखील शक्यता असते. परंतु पृथ्वीपासून सुमारे 62.83 कोटी किलोमीटर अंतरावर एक ग्रह आहे, ज्यावर दररोज 400 हून अधिक सक्रिय ज्वालामुखी फुटतात. त्यामुळे लाव्हा नद्या या ग्रहावर वाहतात असे सांगितले जाते. आपल्या सौर मंडळातील सर्वात सक्रिय हा ग्रह आहे, म्हणजेच त्याच्या भूमीत नेहमीच कोणती न कोणती हालचाल होत असते.

मिळालेल्या माहितीनुसार, आय ओ (IO) असे या ग्रहाचे नाव असून हा आपल्या सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह आहे. जो बृहस्पतिभोवती सुमारे 4.23 लाख किलोमीटरची फेरी मारत असतो. आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षा हा ग्रह थोडासा मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या ग्रहावर एक दिवस हा पृथ्वीच्या 32 तासांइतका असतो. या ग्रहाच्या जमिनीवरील पृष्ठभाग दलदलीचा असल्याने यावरून लव्हाची नदी सतत वाहत असते. या ग्रहाच्या पृष्ठभागावर सतत बदल होत असतो.

- Advertisement -

गॅलिलिओ गॅलेली यांनी 410 वर्षांपूर्वी या ग्रहाचा शोध लावला होता. म्हणजेच 8 जानेवारी 1610 रोजी गॅलीलियो गॅलीली यांनी बृहस्पति या ग्रहाभोवती असणाऱ्या चंद्रासह आणखी तीन ग्रहांचा शोध लावला होता. त्यांची नावं आयो, यूरोपा, गॅनीमेडे आणि कॅलिस्टो असे आहेत. दिलेला फोटो मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये ठेवलेल्या गॅलीलियोच्या त्या कागदपत्रांचा आहे, ज्यात त्याने बृहस्पति ग्रहाच्या चार चंद्रांचा उल्लेख केला आहे.

- Advertisement -

या ग्रहावर जीवन शक्य नाही. कारण इथले तापमान नेहमीच खूप जास्त असते. ज्वालामुखीतून निघणाऱ्या लाव्हामुळे, सल्फर डायऑक्साइड वायू ग्रहाभोवती दाट ढग तयार करतात. कधीकधी सल्फर डायऑक्साइडचा धूर अंतराच्या 200 किलोमीटरपर्यंत जाते.

या ग्रहावरील सर्वात मोठ्या ज्वालामुखीचे नाव आहे लोकी पटेरा असून या ज्वालामुखीचा प्रसार 202 किलोमीटरपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. हा ज्वालामुखी 25 टक्के उष्णता निर्माण करतो. यामुळे, मोठ्या भागात लाव्हाचे तलाव तयार निर्माण होऊन त्याला वाहणाऱ्या नद्यांचे स्वरूप देखील प्राप्त झाले आहे. आय यो ग्रहावरील ज्वालामुखींचा शोध प्रथम 1979 मध्ये लागला. त्यानंतर आतापर्यंत बर्‍याच उपग्रहांनी त्याचा अभ्यास केला आहे.

 


धक्कादायक! हिंगोलीत २५ जवान कोरोना पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या ४६ वर!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -