घरट्रेंडिंगMyntra Logo : मिंत्राचा लोगो बदलला; 'हे' आहे कारण   

Myntra Logo : मिंत्राचा लोगो बदलला; ‘हे’ आहे कारण   

Subscribe

मिंत्राचा लोगो आक्षेपार्ह असल्याची तक्रार सायबर सेलकडे केली होती.

मिंत्रा (Myntra) या ई-कॉमर्स वेबसाईटने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी मिंत्रा वेबसाईटचा लोगो आक्षेपार्ह असल्याची तक्रार महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलकडे केली होती. अवेस्ता फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) संस्थापक नाझ पटेल यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही तक्रार दाखल केली होती. मिंत्राचा लोगो हटवण्याची आणि या कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. मिंत्राचा लोगो नग्न महिलेच्या प्रतिमेप्रमाणे दिसत असल्याचा आरोप पटेल यांनी आपल्या तक्रारीत केला होता.

लोगो महिलांच्या दृष्टीने आक्षेपार्ह

‘मिंत्राचा लोगो हा महिलांच्या दृष्टीने आक्षेपार्ह वाटत आहे. आमच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही मिंत्रा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना ई-मेल पाठवला. त्यांनी आमची भेट घेतली. तसेच आम्ही महिन्याभरात आमचा लोगो बदलू असे आश्वासनही त्यांनी दिले,’ असे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर जागरणशी बोलताना म्हणाल्या.

- Advertisement -

सर्वात मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईटपैकी एक

२००७ मध्ये मिंत्रा या ई-कॉमर्स वेबसाईटला सुरुवात झाली. त्यानंतर २०१४ मध्ये फ्लिपकार्टने, तर २०१६ जबॉन्गने या कंपनीला खरेदी केले. आता मिंत्रा ही देशातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईटपैकी एक आहे.


हेही वाचा – ‘क्यूआर कोड’ने व्यवहार करताय सावधान!     

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -