घरट्रेंडिंगआईच काळीज ते ! पिल्लू नेणाऱ्या विषारी सापाला उंदराने दाखवला इंगा, थरारक...

आईच काळीज ते ! पिल्लू नेणाऱ्या विषारी सापाला उंदराने दाखवला इंगा, थरारक व्हिडीओ एकदा पाहाचं

Subscribe

IFS अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 'आपले अस्तित्व वाचवण्यासाठी लढत राहणे हा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे', असे म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. सगळ्या जगाच दुख: ती आपल्यावर घेऊन मुलाला वाचवण्यासाठी जीवाचे रान करू शकते. आई आणि मुलांमधील मायेचे नाते कसे असते याचं उत्तर उदाहरण असलेला उंदीर आणि सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी एका आईचे काळीज विषारी सापाशी लढण्यासाठी घाबरले नाही. आई हे मायेचे कवच आहे असे आपण म्हणतो आई आपल्या मुलावर किती प्रेम करते आणि त्याच्यासाठी काहीही करू शकते हे यातून पहायला मिळते. हा थरारक व्हिडीओ एकदा पाहाच

- Advertisement -

व्हायरल व्हिडीओमध्ये एक विषारी साप उंदराचे छोटे पिल्लू तोंडात घेऊन रस्त्याच्या कडेने जात आहे. आपल्या पिल्लाला घेऊन जाणाऱ्या सापाला पाहताच उंदीर सापावर हमला करते. आपल्या दाताने सापाच्या शेपटीवर हल्ला करते.  उंदराने सापाची दात मारुन सापाची शेपटी रक्तभंबाळ केली. अखेर नाइलाजाने सापाला आईच्या मायेपुढे झुकावेच लागले. सापाने पिल्लाला सोडून दिले. मात्र तरीही शेवटपर्यंत उंदराने सापाचा पिच्छा सोडला नाही. साप खरंच आपल्या वाटेतून गेला आहे याची खात्री होईपर्यंत उंदराने सापाचे पाठलाग थांबवला नाही.

साप आणि उंदराचा हा थरारक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एक आई आपल्या मुलासाठी काय करू शकते याचे उदाहरण या व्हिडीओतून पाहता आले. IFS अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘आपले अस्तित्व वाचवण्यासाठी लढत राहणे हा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे’, असे म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 24 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. आई सारखी काळजी या जगात कोणीही घेऊ शकत नाही अशा कमेंट व्हिडीओवर पहायला मिळत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – टेक्स्ट मेसेज पाठवण्यासाठी ‘या’ महिलेला मिळायचा दीड लाख रुपये पगार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -