भयंकर! तरुणीने चिकन बर्गर खाताना खाल्लं मानवी बोटंही

Woman finds a rotting HUMAN finger in her hamburger in Bolivia
भयंकर! तरुणीने चिकन बर्गर खाताना खाल्लं मानवी बोटंही

आपण अनेक वेळा हॉटेलमधील निष्काळजीपणा संदर्भातील बातम्या वाचल्या आहेत. कधी जेवणात पाल मिळाल्याची, तर कधी माशी मिळाल्याची बातमी आपण वाचली असेल. अनेक वेळा रेस्टॉरंटमध्ये शीळ जेवण देखील दिलं जात. जेव्हा खूप जोरात भूक लागते तेव्हा आपण फास्ट फूड खाताना जास्त लक्ष देत नाही. त्यादरम्यान फास्ट फूड आपापल्याला लगेचच उपलब्ध होते. पण एका महिलेने बर्गरमधून मानवी बोटं नकळत खाल्ल्याची हैराण करणारी घटना घडली आहे. या महिलेने आपला अनुभव शेअर केला आहे.

दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया येथे राहणारी ही महिला आहे. या महिलेने सुपरमार्केटमधून हॅम बर्गर घेतला होता. मग ती घरी घेऊन गेली आणि गरम केला. त्यानंतर जे काही झाले हे हैराण करणारे होते. दरम्यान महिला जो बर्गर खात होती, त्यामध्ये एका माणसाचे कापलेलं बोटं होत. हे पाहून तिला धक्काचं बसला.

डेलीमेलच्या वृत्तानुसार, या महिलेचे नाव एस्टेफनी बेनिटेज असं आहे. एस्टेफनीने जसा बर्गर खायला सुरुवात केला तेव्हा तिला जाणवले की बर्गरमध्ये काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे एस्टेफनीने बर्गरमध्ये व्यवस्थित पाहिले, तर तिला बर्गरमध्ये माणसाचं बोटं सापडलं. कंपनीने बर्गर न पाहता बाजारात पॅक करून पाठवले होते.

माहितीनुसार, बर्गर तयार करताना एका व्यक्तीची दोन बोटं कापली होती. कंपनीने न पाहता बर्गरमध्ये बोटं पॅक करून दिले. सध्या फक्त एकचं बोटं मिळाले आहे, दुसऱ्या बोटाचा तपास घेतला जात आहे.


हेही वाचा – Video Viral: बापरे बाप! तरुणीने सापालाच बनवला अंबाड्याचा चाप