घरट्रेंडिंगभारतात महिलांचा सम्मान फक्त बोलण्यात दिसतो - पी. व्ही. सिंधू

भारतात महिलांचा सम्मान फक्त बोलण्यात दिसतो – पी. व्ही. सिंधू

Subscribe

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला सम्मानाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. महिलांच्या सम्मानाबद्दल भारत आणि इतर देशात अंतर असल्याचे तिने सांगितले आहे. सिधूच्या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

बॉलिवूडमध्ये #metoo मोहीमेनंतर आता खेळाडूही यावर उघडपणे वक्तव्य करत आहेत. #metoo चे वादळ शांत झाले असले तरीही अजून या घटनांबाबत चर्चा सुरुच आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने भाराताच्या महिला सम्मानाबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. भारतातील लोक म्हणतात महिलांना सम्मान दिला पाहिजे, मात्र असे कमी लोकच असतात असे सिंधूने म्हटलं आहे. तिच्या वक्तव्यानंतर लोकांनीही सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे.

काय म्हणाली सिंधू

“खेळासाठी मी भारता बाहेर दौऱ्यावर जाते. तेव्हा तेथील महिलांचा खूप सम्मान होत असल्याचे मला दिसून येते. इतर देशात महिलांचा सम्मान होते हे पाहून मला समाधान वाटते. भारतामध्ये अनेकजण महिलांच्या सम्मानाबद्दल वक्तव्य करतात, मात्र असे कमी लोक आहेत जे बोलतात त्याचे पालन करतात. महिलांना स्वतःला मजबूत बनवणे आवश्यक आहे. त्यांनी न घाबरता त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले पाहिजे. यामध्ये लाज वाटण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. त्यांना गर्व वाटला पाहिजे की आपल्याबरोबर झालेल्या अन्यायाबद्दल आपण वाचा फोडतो आहे.”- पी. व्ही. सिंधू

- Advertisement -

सिंधू झाली ट्रोल

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -