घरमुंबईMumbai Marathon: पुरुष म्हणतायत 'मर्द को भी दर्द होता है'

Mumbai Marathon: पुरुष म्हणतायत ‘मर्द को भी दर्द होता है’

Subscribe

महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांसाठीही पुरुष आयोग असावा, या मागणीसाठी आज मुंबई मॅरेथॉनमध्ये काही पुरुष मंडळींनी सहभाग घेतला. त्यांच्या हातातील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

आशियातली सर्वात मोठी मॅरेथॉन म्हणून मुंबई मॅरेथॉनचा उल्लेख केला जातो. धावपटूंसोबतच अनेक सामाजिक संदेश देणारे लोक आणि संस्था देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतात. यावर्षीचे मुख्य आकर्षण ठरले ‘वास्तव फाऊंडेशन’ या संस्थेचे कार्यकर्ते. पुरुष आयोगाची स्थापना करा, या प्रमुख मागणीसाठी वास्तवचे कार्यकर्ते मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. ‘मर्द को भी दर्द होता है, आज की स्वीटू, कल की मीटू’ अशा घोषणांसहीत आम्हाला हवाय ‘पुरुष आयोग’ असा संदेश लिहिलेले फलक हाती घेऊन, ही पुरुष मंडळी मॅरेथॉनमध्ये आपल्या व्यथा सांगताना दिसले.

- Advertisement -

 

“देशातील कायदे हे महिलांच्या बाजूने आहेत. त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी केंद्र आणि राज्यात महिला आयोगाची स्थापना केलेली आहे. मात्र महिलांच्या खोट्या तक्रारीचा प्रतिवाद करण्यासाठी कोणतेही कायदे नाहीत. त्यामुळे सरकारने पुरुष आयोगाची स्थापना करावी, अशी प्रमुख मागणी वास्तव फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या मॅरेथॉनमध्ये लावून धरली. मी डॉक्टर आहे, मला पुरुष आयोग हवाय.. अशा आशयाचेच फलक घेऊन लोक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मी शेतकरी, मी पोलीस, मी वकिल, मी सैनिक.. अशाही फलकांचा यामध्ये समावेश होता.

- Advertisement -

यावर्षीच्या ४२ किमीच्या मॅरेथॉनमध्ये केनियाच्या कॉसमस लॅगटने पुरुष गटात स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं तर महिला गटात इथिओपियाच्या वोर्केंश अलेमूने आपले नाव कोरले. तर २१ किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या गटातून श्रीनू मुगाता तर महिला गटातून मीनू प्रजापती यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत ४६ हजार ४१४ धावपटूंनी सहभाग घेतला होता.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -