घरमुंबईपतंगबाजी करताना भाजून तरुण जखमी, प्रकृती चिंताजनक!

पतंगबाजी करताना भाजून तरुण जखमी, प्रकृती चिंताजनक!

Subscribe

मुंबईच्या विक्रोळी पार्क साईट रोडवरील घटना असून या मुलाचे नाव ओमकार तावडे असे आहे.

मकरसंक्रांत या सणादरम्यान पतंग उडवताना अनेकदा विजेच्या वायर्सला शॉक लागून जखमी होण्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना मुंबईतील विक्रोळीच्या पार्क साईट परिसरात घडली आहे. बुधवारी म्हणजेच १६ तारखेला २२ वर्षीय ओमकार तावडे हा मुलगा पतंग उडवत असताना त्याचा हात अचानक विजेच्या वायरला लागला. विजेच्या वायरला हात लागल्यामुळे मुलाला शॉक लागला आणि तो त्यात ८० टक्के भाजला. शिवाय, त्याचा तोल जाऊन खाली पडल्यामुळे मेंदूलाही मार बसला. या मुलावर सध्या सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

प्रकृती चिंताजनक – डॉ. मधुकर गायकवाड

विजेच्या वायर्सजवळ पतंग उडवू नये, अशी वारंवार जनजागृती करुन देखील लहान मुलं सर्रास पतंगबाजी करतात. त्यातून, शॉक लागणे किंवा पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजात अडकून मृत्यू होण्याचे प्रकार घडतात.

पतंग उडवताना विजेच्या वायर्सला हात लागल्यामुळे जखमी झालेल्या अवस्थेत एक मुलगा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. या मुलाला शॉक लागल्यामुळे तो ८० टक्के भाजला. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासूनच त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो पतंग पकडण्यासाठी म्हणून विजेच्या वायर्सजवळ गेला असेल. तेव्हा त्याला शॉक लागला आणि तो खाली पडला. तेव्हा त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. सध्या या मुलावर अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती नाजूक आहे.
– डॉ. मधुकर गायकवाड, सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक
- Advertisement -

पतंग उडवताना २ मुलांचा मत्यू

पतंग उडवताना किंवा ती पकडण्याचा प्रयत्न करताना तोल जाऊन मृत्यू होण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. अशाच दोन घटना नाशिकमध्ये घडल्या होत्या. मंगळवारी मकरसंक्रांतीनिमित्त शहरातील बालाजीनगर भागात राहणारा सुफियान निजाम कुरेशी (१६) जागृतीनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पतंग उडवत होता. या वेळी तोल गेल्याने तो जमिनीवर पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुफियानला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तर, दुसऱ्या घटनेत एका इमारतीवर तुषारसह आठ-दहा मुले पतंग उडवत होती. तुषारच्या कानाला हेडफोन होता. पतंग उडवतानाच फोनवर बोलत असताना इमारतीजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला तो चिकटला आणि तो जखमी झाला. तुषारला शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये नेले. पण, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -