घरUncategorizedमुंबईकरांचे घर देशातील इतर शहरांपेक्षा सर्वात 'सेफ'; वाचा पुर्ण अहवाल

मुंबईकरांचे घर देशातील इतर शहरांपेक्षा सर्वात ‘सेफ’; वाचा पुर्ण अहवाल

Subscribe

अवघ्या १५ मिनिटांसाठी घरा बाहेर पडतांना देखील मुंबईकर घराला टाळा लावतात आणि मगच बाहेर पडतात.

भारतातील सुरक्षाविषयक उत्पादने बनवणाऱ्या गोदरेज सोलुशन्स या आघाडीच्या कंपनीने नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वक्षणानुसार आपल्या घरांच्या सुरक्षेच्या बाबतीत इतर शहरांच्या तुलनेत मु्ंबईकर अधिक जागृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सर्वेप्रमाणे एक-चतुर्थांशपेक्षा जास्त मुंबईकरांच्या बाबतीत घरफोडीच्या घटना घडल्याचे देखील समोर आले आहे. तसेच घराच्या सुरक्षेच्या बाबतीत वेगवेगळ्या शहरातील लोकांच्या अनेक चांगल्या आणि वाईट सवयी देखील यातून समोर आल्या आहेत.

या गोष्टींचा सर्वेकरण्यात आला 

मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत असलेल्या काळजी पोटी या वस्तू कपाटात ठेवणाऱ्यांची संख्या, घरफोडीच्या घटना, घराची किल्ली शेजाऱ्यांकडे देणाऱ्यांची आकडेवारी, आपले पाकीट हरवेल असे वाटणाऱ्यांची संख्या, घराच्या मुख्य दाराला वेळोवेळी टाळा लावणाऱ्यांची आकडेवारी या गोष्टींचा सर्वे करण्यात आला.

- Advertisement -

सर्वेनंतर आकडेवारी

मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत असलेल्या काळजी पोटी या वस्तू कपाटात ठेवणाऱ्या मुंबईकरांचा टक्का केवळ ३८.८ टक्के आहे. मुंबईत एक चतुर्थांश घरांच्या बाबतीत घरफोडीच्या घटना घडल्याने त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ती काळजी मुंबईकरांकडून घेतली जात असल्याच समोर आले आहे. या तुलनेत राष्ट्रीय पातळीची ही आकडेवारी ५२.४ टक्के आहे. केवळ १५ मिनिटांसाठी घराबाहेर पडताना घराच्या मुख्य दाराला कुलूप लावणारे ५८.७ टक्के मुंबईकर आहेत, तर राष्ट्रीय पातळीवर केवळ ३७.२ टक्के लोक घराच्या मुख्यदाराला कुलूप लावत असल्याचे आढळून आले आहे.

२४ तास धावती असणाऱ्या मुंबई शहरातील लोकांना आपले पाकीट हरवेल, असे वाटणाऱ्यांचा टक्का सूमारे ८१ टक्के आहे. तर इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण ५१.७ टक्के आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरा शेजारी कोण राहतं? ते मुंबईकरांना माहीत नाही, अस म्हंटल जात. मात्र ६९ मुंबईकर आपल्या घराशेजाऱ्यांना किल्ली देतात. हेच प्रमाण देशपातळीवर ४७ टक्के इतके आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -