Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पालघरमध्ये मॉब लिंचिंग, पोलिसांच्या गाडीतच तिघांची हत्या

पालघरमध्ये मॉब लिंचिंग, पोलिसांच्या गाडीतच तिघांची हत्या

Related Story

- Advertisement -

राज्यात असलेल्या लॉकडाऊनच्या वातावरणात रात्रीच्या वेळी चोर आणि दरोडेखोर यांचा ग्रामीण भागात वावर वाढतोय, अशी अफवा गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये पसरली आहे. त्यामुळे या भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच गुरूवारी रात्री गडचिंचले येथील ग्रामस्थांनी या मार्गावरून प्रवास करणार्‍या तीन व्यक्तींना चोर असल्याच्या गैरसमजातून दगड आणि लाठी-काढ्यांनी बेदम मारहाण केली. यात दोन साधूंसह तीन जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांवरही गावकर्‍यांनी हल्ला चढवत त्यांच्या गाड्यांची नासधूस केली. या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

Comments are closed.