Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजित पवारांच्या मतदारसंघातील विकासकामांना शिंदेंचा ब्रेक

अजित पवारांच्या मतदारसंघातील विकासकामांना शिंदेंचा ब्रेक

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंजुरी दिलेल्या विकासकामांना स्थगिती दिली आहे. यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. अजित पवारांच्या मतदारसंघातील विकासकामांना २४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या दोन ते तीन महिन्यामध्ये ९४१ कोटी विकासकामांना दिले होते. यामधील अधिक निधी अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातील विकासकामांसाठी देण्यात आला होता. मुख्यमंत्री शिंदेंनी या कामांना स्थगिती दिल्यामुळे अजित पवारांना हा मोठा दणका मानला जात आहे.

- Advertisement -