घरराजकारणविधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची निवड झाल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पदावर शिवसेनेने दावा केलेला असतानाच काँग्रेसने देखील हे पद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शिवसेनेत झालेल्या ‘उठावा’मुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेतील फुटीर गटाने भाजपाच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर विधानसभेत १६४ मत मिळवून त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – शांततेची भूमिका घेऊन पुढाकार घ्यावा, दीपाली सय्यद यांचा संजय राऊतांना सल्ला

आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिघेही इच्छुक असून मुख्य स्पर्धा शिवसेना आणि काँग्रेसमध्येच आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे ११ आमदार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी १० आमदार आहेत. महाविकास आघाडी कायम राहिल्यास अन्य तीन आमदारांसह ३४ आमदारांचे पाठबळ आहे. तर, भाजपाकडे एकून २८ आमदार आहेत. राज्यपाल नामनियुक्त १२ जागांसह इतर ४ जागा रिक्त आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसला एकनाथ शिंदे यांच्यासाठी विरोधी पक्षनेतेपद हवे असल्याचे सांगितले जात आहे. तर, शिवसेनेकडून अद्याप नाव समोर आलेले नाही. पण आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज या पदासाठी काँग्रेस इच्छुक असल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात अन्य पक्षांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – गौरवास्पद : सिंगापूर ओपनचे जेतेपद मिळवत पी. व्ही. सिंधूने घडवला इतिहास

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -