राखी सावंत गेली बूस्टर डोस घ्यायला; विचित्र अवतार पाहून युजर्सना हसू आवरेना

राखी सावंतचा हा विनोदी व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच अनेकजण सोशल मीडियावर खूप कमेंट देखील करत आहेत.

हिंदी टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत वारंवार चर्चेत असते. राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वारंवार आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ राखी शेअर करत असते. नुकताच राखीचा एक गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने नेहमी प्रमाणे विचित्र वेष करून ती कोविडचा बूस्टर डोस घेण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. त्यावेळी तिने तिच्या डोक्यावर ब्राउन कलरचे नकली केस लावलेले आहेत.तिचा हा आगळावेगळा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडलेला आहे.

राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती म्हणतेय की, “आज मी बूस्टर घेण्यासाठी आले. प्रत्येक जागी लोक खूप आजारी पडत आहेत. ताप..ताप…ताप…” इतक्यात नर्स तिला डोस द्यायला येते. तेव्हा नर्सच्या हातातलं इंजेक्शन पाहून राखी जोरात ओरडते. मात्र, इंजेक्शन घेतल्यानंतर राखी व्हिडीओमध्ये म्हणते की,” आजारी पडू नये म्हणून मी आज बूस्टर घेतला आहे. मी सतत प्रवास करत असते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखी सावंतचा हा विनोदी व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच अनेकजण सोशल मीडियावर खूप कमेंट देखील करत आहेत. या व्हिडीओ सोबतच राखीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राखी म्हणतेय की, “मला लॉ मिनिस्टर बनवा, माझ्या देशात एकही बलात्कार होणार नाही. माझ्या देशातील मुलांसाठी इतके कडक कायदा बनवेन की देशात एक सुद्धा बलात्कार होणार नाही. जेवढे पण मुलं आहेत ती राखी सावंतचं नाव एकूण घाबरतील.”

दरम्यान, सध्या राखी सावंत अलीकडे तिचा नवा बॉयफ्रेंड आदिलमुळे खूप चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोघ एकमेकांना डेट करू लागले आहेत. प्रत्येक पार्टीमध्ये दोघं एकत्र असतात. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघंही आता लग्नाचं प्लानिंग करत आहेत.


हेही वाचा :अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा ‘सेल्फी’ या दिवशी होणार प्रदर्शित