घरव्हिडिओआरोग्य भरती परीक्षेवरुन राजकारण सुरू

आरोग्य भरती परीक्षेवरुन राजकारण सुरू

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गातील पदांच्या भरती प्रक्रियेतील पुन्हा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेचे नियोजन करणाऱ्या न्यासा कंपनीच्या गलथान कारभारामुळे यापूर्वी परीक्षा रद्द करण्याची वेळ आली होती. यानंतर गट क आणि गट ड पदाच्या परीक्षा २४ आणि ३१ ऑक्टोबरला परीक्षा आयोजित करण्यात निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र पुन्हा परीक्षेच्या वेळापत्रकात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या परीक्षा वरून पुन्हा राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्षांनी सरकारला या परीक्षांवरुन धारेवर धरले आहे. नेमका हा घोळ काय आहे आणि विरोधी पक्षांनी काय टीका केली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ..

- Advertisement -