Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ Boriwali: गजानन इमारतीच्या सातव्या मजल्याला आग

Boriwali: गजानन इमारतीच्या सातव्या मजल्याला आग

Related Story

- Advertisement -

बोरिवली पश्चिमेकडील गजानन इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्य़ा चार ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवताना एक अधिकारी गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर काही लोक अडकले असल्याची भीती असून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisement -