Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Covid-19: फिलिपिन्सने भारतासह ९ देशांमधील हवाई प्रवासबंदी उठवली

Covid-19: फिलिपिन्सने भारतासह ९ देशांमधील हवाई प्रवासबंदी उठवली

Related Story

- Advertisement -

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना व्हायरसचा कहर सुरू असून यादरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून एका देशातून दूसऱ्या देशात विमान प्रवासास बंदी घालण्यात आली होती. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि होणारी वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता फिलिपिन्सने भारतासह इतर नऊ देशांवर प्रवासबंदी लागू केली होती. ही प्रवासबंदी आता ६ सप्टेंबरपासून हटवली जाणार आहे. फिलिपिन्सने भारत आणि इतर नऊ देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी प्रवास प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासाची बंदी हटवली असली तरी कोरोना, डेल्टा व्हेरिएंटची रूग्ण कमी झालेली नाही, असे फिलिपिन्सच्या अध्यक्षांचे प्रवक्ते हॅरी रोके यांनी सांगितले.

फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, ओमान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशियातील प्रवासाचे निर्बंध उठवण्यासाठी आंतर-एजन्सी कोरोना टास्क फोर्सच्या शिफारशीला मंजुरी दिली आहे. रोके यांनी एका निवेदनात म्हटले की, वरील देशांमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मात्र योग्य प्रवेश, चाचणी आणि क्वारंटाईन अशा नियमांचे पालन करणं आवश्यक असणार आहे. फिलिपिन्समध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर सुरू असून परदेशी पर्यटकांना अजूनही फिलीपिन्सच्या नागरिकांसारखे विशेष व्हिसा धारक वगळता देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव फिलिपिन्समध्ये आहे. देशात ३३ मृत्यूंसह १ हजार ७०० हून अधिक डेल्टा व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंटच्या फैलावाचा अभ्यास केला असता असे म्हटले आहे की, आता फिलिपिन्समध्ये कोरोनाव्हायरसचा धोका अद्याप कायम आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, फिलिपिन्सने एप्रिलमध्ये भारतास बंदी घातली आणि नंतर डेल्टाचा फैलाव असलेल्या इतर नऊ देशांमध्ये प्रवासबंदी केली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, फिलिपिन्समध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग सुरूच आहे. आग्नेय आशियाई देशात शुक्रवारपर्यंत एकूण २ लाख ४० हजार ५६८ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये ३३ हजार ८७३ जणांचा मृत्यू झाला.


CoronaVirus जुनाच! 21 वर्षांपूर्वीही होता अस्तित्वात; संशोधकांचा दावा

- Advertisement -