Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भजन, किर्तन करणारे ८० वर्षांचे आजोबा निवडणूक रिंगणात

भजन, किर्तन करणारे ८० वर्षांचे आजोबा निवडणूक रिंगणात

Related Story

- Advertisement -

परिते तालुका माढा गावातील विष्णू कृष्णा कुंभार हे 80 वर्षीय आजोबा यावेळी विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी माढा विधानसभेचा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. कुंभार आजोबा हे वारकरी संप्रदायाचे आहेत. भजन, किर्तन, भारुड सादर करून ते आपली उपजीविका करतात. या कार्यक्रमातून मिळणारे पैसे साठवून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. विष्णू कृष्णा कुंभार यांनी आतापर्यंत दोन निवडणुका लढवल्या आहेत.

ही त्यांची तिसरी निवडणूक आहे. माढा विधानसभेसाठी त्यांनी हातात भगवा ध्वज घेऊन शुक्रवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. माढा मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालेला नाही. मतदार संघाच्या आणि जनसामान्यांच्या विकासासाठी मी निवडणुकीस उमेदवारी दाखल करुन रिंगणात उतरलो असल्याचे ते म्हणाले. कुंभार यांचे कुटुंबिय त्यांनी घरी बसावे, कशाला हे नको ते उद्योग म्हणून त्यांच्या मार्गात अडथळे आणत आहेत. पण तरीही कुंभार आजोबा आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आज निवडणूक लढत आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत या आजोबांनी दोन वेळा निवडणूक लढवली आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधातही त्यांनी निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातून उभे असताना त्यांच्या विरोधात विष्णू कुंभार निवडणुकीच्या रिंगणात होते. तसेच माढा विधानसभा मतदार संघातून माजी आमदार विनायक पाटील, भाई एस.पाटील यांच्या विरोधात देखील विधानसभा निवडणूक लढवली होती. सर्वसामान्य माणूस देखील निवडणूक प्रक्रियेत सक्रिय व्हायला हवा. विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीच मी उमेदवारी अर्ज भरला आहे. ही माझी तिसरी वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -