घरमहाराष्ट्रआणि कार्यकर्ते रडू लागले...

आणि कार्यकर्ते रडू लागले…

Subscribe

निवडणूक लढवावी म्हणून सांगोलेकरांचा गणपतरावांना आग्रह

आदर्श कशाने खातात याची चर्चा आज आयाराम-गयारामांमुळे सर्वदूर सुरू असताना या सर्वांपुढे आदर्श निर्माण करणारे सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. आपला निर्णय गणपरावांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत बोलून दाखवला आणि कार्यकर्ते धायमोकलू लागले. अनेकांनी त्यांचे पाय पकडले. रडकुंडे झालेल्या कार्यकर्त्यांनी गणपतरावांना गळ घातली. पण ते बधले नाहीत. मी नसलो तरी आपण शेकापचाच उमेदवार निवडून आणायचा असा पण त्यांनी बोलून दाखवला. पण कार्यकर्त्यांना हवेत गणपतरावच. विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना इतर पक्षांमध्ये पक्षांतराची मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या सांगोल्याच्या या नेत्याने सार्‍या राज्यातल्या नेत्यांना आदर्श दाखवून दिला आहे.

निवडणूक जवळत येत असताना मतदारसंघातील वातावरणही तापू लागले आहे. मतदानाचा मुहूर्त जाहीर होत असताना अनेक आमदार आणि नेते या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसर्‍या पक्षात उड्या मारताना दिसून येत आहेत. एकीकडे दलबदलू आमदारांचा बोलबाला सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या गणपतराव देशमुख यांनी या आमदारांपुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. गणपतराव देशमुख सलग 11 वेळा सांगोल्यातून शेकापचे आमदार म्हणून निवडून येत आहेत. राज्य विधानसभेतील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणार्‍या गणपरावांच्या मनात कधीही पक्षबदल करण्याचा विचार केला नाही. त्यांच्या याच प्रामाणिकतेमुळे सांगोलेकरांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्याच्याच पारड्यात आपली मतं टाकली. आता निवडणूक जवळ येत असताना पुन्हा एकदा त्यांच्यावरील जनतेचे प्रेम दिसून आले आहे.

- Advertisement -

सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमातील एका घटनेचा संदर्भ यासाठी दिला जात आहे. देशमुख यांनी यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे घोषित केले आणि उपस्थितांमध्ये जणूकाही सुतकच पसरलं. कार्यकर्त्यांनी गलका करत ‘तुम्हीच आमचे उमेदवार’ असं सांगत काहींनी गणपरावांचे पायच धरले. काहींना तर रडू आवरले नाही. ते सगळेच गणपतरावांना आग्रह करत होते. कार्यकर्त्यांनी अक्षरशः त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना विंनती केली. तसेच काहींना तर अश्रू देखील अनावर झाले. मात्र त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसून मी हयात असेपर्यंत आपल्याला येथून शेकापचाच आमदार निवडून आणायचा असल्याचे देखील सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -