घरमहाराष्ट्रखडसे, तावडे, मेहता,बावनकुळे गॅसवर!

खडसे, तावडे, मेहता,बावनकुळे गॅसवर!

Subscribe

भाजपची १२५ जणांची पहिली यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती कागदावरून जाहीर झाल्यानंतर युतीतील मोठा भाऊ भाजपने मंगळवारी १२५ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री प्रकाश मेहता, मुख्य प्रतोद राज पुरोहित नाशिक पूर्वचे भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांना पहिल्या यादीतून वगळल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांना उमेदवारी देताना आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी नाकारण्यात येईल, असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून उमेदवारी दिली. मात्र आमदार संदीप नाईक यांची ऐरोलीतून उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

१२५ जणांच्या पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांचा समावेश आहे आणि १२ विद्यमान आमदारांना संधी नाकारण्यात आली. यात कोथरूडच्या मेधा कुलकर्णी यांच्यासह उदेसिंग पडवी (शहादा), उमेश भैयासाहेब पाटील (चाळीसगाव), सुधाकर कोहले (नागपूर दक्षिण), राजू तोडसाम (आर्णी), विष्णू सवरा (विक्रमगड), सरदार तारासिंग (मुलुंड), विजय काळे (विजयनगर), दिलीप कांबळे ( पुणे कटोंन्मेंट), आर. टी. देशमुख (गेवराई) यांचा समावेश आहे. माजी आदिवासी मंत्री विष्णू सवरा यांच्याऐवजी त्याच्या मुलाला डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी देणार आली आहे.

तर माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना घरी बसवताना त्याच्या भावाला सुनील कांबळे यांना संधी दिली आहे. याचवेळी कल्याण पश्चिममधील भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांना उमेदवारी नाकारत हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातूनच लढणार आहेत. तर, गिरीश बापट खासदार झाल्यामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दक्षिण कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल भोसले यांना उतरवण्यात आले आहे.

- Advertisement -

खडसेंनी अपक्ष अर्ज भरला
भाजपने पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना डावलल्याने खडसे समर्थक आक्रमक झाल्याने समर्थकांच्या मागणीनुसार खडसे यांंनी मुक्ताईनगरमधून मंगळवारी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. त्यावेळी पक्षासाठी आयुष्य खर्च करणे हा गुन्हा असेल तर तो मी केला आहे. ‘कालाय तस्मेय नमः’ माझ्या उमेदवारीबाबत पक्ष काय निर्णय घेतो आहे ते पाहू. मी अर्ज भरला असून तुम्ही मला साथ द्याल ना, असे भावनिक आवाहनही खडसे यांनी केले. समर्थकांनी खडसेंच्या कोथळी येथील घरासमोर ठिय्या मांडत पक्षाचे काम न करण्याचा निर्णय घेतला.

भाजपच मोठा भाऊ
भारतीय जनता पक्ष-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीतील प्रत्येक पक्ष नेमका किती जागा लढणार, हा फॉर्म्युला अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार, भाजप १६४ व शिवसेना १२४ जागांवर निवडणूक लढणार आहे. मित्रपक्षांना द्यावयाच्या १८ जागा भाजप स्वत:च्या कोट्यातून देणार आहे. याशिवाय विधान परिषदेच्या २ जागा भाजपने शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

उमेदवारी डावलण्यात आलेले विद्यमान आमदार
भाजपने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी (कोथरूड), उदयसिंह पाडवी (शहादा), सुधाकर कोहणे ( नागपूर पश्चिम), राजू तोडसाम (अर्णी), विष्णू सवरा (विज्ञ्रढमगड), सरदार तारासिंह (मुलुंड), विजय काणे ( शिवाजीनगर, पुणे), दिलीप कांबणे (पुणे वुढण्टोमेंट), आर. टी. देशमुख ( माजलगाव) यांना उमेदवारी नाकारली आहे.

‘भाजपचे मुंबईतील उमेदवार
मनीषा चौधरी (दहिसर), मिहीर कोटेचा (मुलुंड), अतुल भातखणकर (कांदिवली पूर्व), योगेश सागर (चारकोप), विद्या ठाकुर (गोरेगाव), अमित साटम (अंधेरी पश्चिम), पराग अणवणी (विलेपार्ले), राम कदम (घाटकोपर पश्चिम), आशीष शेलार (वांद्रे पश्चिम), वुढ. तमीण सेल्वन (सायन कोणीवाडा), कालीदास कोणंबकर (वडाणा), मंगलप्रभात लोढा (मलबारहिल)

अन्य मातब्बर उमेदवार
जयकुमार रावण (शिंदखेडा), गिरीश महाजन ( जामनेर), सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), हरिभाऊ बागडे (फुलंब्री), रवींद्र चव्हाण (डोंबिवली), राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), पंकजा मुंडे (परणी), हर्षवर्धन पाटील (इंदापूर), सुभाष देशमुख ( सोलापूर दक्षिण), शिवेंद्रराजे भोसले (सातारा)

भाजपची पहिली यादी जाहीर

१) नागपूर दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस, २) कोथरूड- चंद्रकांत पाटील, ३) नंदूरबार – विजयकुमार गावित, ४) नवापूर- भारत गावित, ५) रावेर- हरीभाऊ जावळे, ६) भुसावळ – संजय सावकारे, ७) अकोला (प.)- गोवर्धन शर्मा, ८) अकोला (पू.) – रणधीर सावरकर, ९) जामनेर- गिरीश महाजन, १०) जळगाव जामोद -संजय कुटे, ११) शहादा- राजेश पडवी, १२) जळगाव शहर- सुरेश भोळे, १३) सिंदखेडा- जयकुमार रावल, १४) धुळे ग्रामीण – ज्ञानज्योती बदाणे, १५) अमळनेर – शिरीष चौधरी, १६) चाळीसगाव- मंगेश चव्हाण, १७) माण- जयकुमार गोरे, १८) तुळजापूर- राणा जगजितसिंह पाटील, १९) अकोले -वैभव पिचड, २०) राहुरी- शिवाजीराव कर्डिले, २१) औसा- अभिमन्यू पवार, २२) वांद्रे पश्चिम- आशिष शेलार, २३) नाशिक मध्य- देवयानी फरांदे, २४) ऐरोली- संदीप नाईक, २५) शिर्डी- राधाकृष्ण विखे-पाटील, २६) इंदापूर- हर्षवर्धन पाटील, २७) अमरावती- सुनील देशमुख, २८) वर्धा- पंकज भोयर, २९) मूर्तिजापूर- हरीश पिंपळे, ३०) पुणे कँटोन्मेंट- सुनील कांबळे, ३१) वाशिम-लखन मलिक, ३२) कारंजा- राजेंद्र पटणी, ३३) दर्यापूर-रमेश बुंदिले, ३४) मोर्शी – डॉ. अनिल बोंडे, ३५) आर्वी – दादाराव केंचे, ३६) हिंगणघाट- समीर कुणावार, ३७) नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे, ३८) उमरेड – सुधीर पारवे, ३९) हिंगणा- समीर मेघे, ४०) राजुरा – संजय धोत्रे, ४१) आमगा-संजय पूरम, ४२) मलकापूर- चैनसुख संचेती, ४३) चिखली- श्वेता महाले, ४४) खामगाव- आकाश फुंडकर, ४५) अकोट- प्रकाश भारसाकळे, ४६) सावनेर- राजीव पोतदार, ४७) नागपूर दक्षिण- मोहन मते, ४८) नागपूर मध्य- विकास कुंभारे, ४९) नागपूर पश्चिम- सुधाकर देशमुख, ५०) नागपूर उत्तर- मिलिंद माने, ५१) अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले, ५२) तिरोरा- विजय रहांगदले, ५३) आरमोरी- कृष्णा गजभे, ५४) गडचिरोली – देवराव होली, ५५) चंद्रपूर-नाना शामकुळे, ५६) बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार, ५७) चिमूर- किर्तीकुमार भांगडिया, ५८) वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार, ५९) राळेगाव-अशो उइके, ६०) यवतमाळ- मदन येरावार, ६१) आर्नी – संदीप धुर्वे, ६२) भोकर- बापुसाहेब गोर्ठेकर, ६३) मुखेड- तुशार राठोड, ६४) हिंगोली- तानाजी मुटकुळे, ६५) परतूर- बबनराव लोणीकर, ६६) बदनापूर- नारायण कुचे, ६७) भोकरदन-संतोष दानवे-पाटील, ६८) फुलंब्री-हरीभाऊ बागडे, ६९) औरंगाबाद पूर्व-अतुल सावे, ७०) परळी- पंकजा मुंडे, ७१) गंगापूर- प्रशांत बम, ७२) चांदवड- राहुल आहेर, ७३) नाशिक पश्चिम- सीमा हिरे, ७४) डहाणू- पास्कल धनारे- ७५) विक्रमगड – हेमंत सावरा, ७६) भिवंडी पश्चिम- महेश चौघुले,७७) मुरबाड-किसन कथोरे, ७८) कल्याण पूर्व-गणपत गायकवाड, ७९) डोंबिवली- रवींद्र चव्हाण, ८०) मीरा भाईंदर-नरेंद्र मेहता, ८१) ठाणे -संजय केळकर, ८२) दहिसर – मनीषा चौधरी, ८३) मुलुंड – मिहीर कोटेचा, ८४) कांदिवली पूर्व-अतुल भातखळकर, ८५) चारकोप -योगेश सागर, ८६) घाटकोपर (प.)-राम कदम, ८७) गोरेगाव- विद्या ठाकूर, ८८) विलेपार्ले -पराग अळवणी, ८९) सायन कोळीवाडा-तामीळ सेल्वन, ९०) वडाळा (मुंबई)- कालिदास कोळंबकर, ९१) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, ९२) बेलापूर -मंदा म्हात्रे, ९३) पनवेल-प्रशांत ठाकूर, ९४) पेन -राजीवशेठ पाटील, ९५) शिरूर- बाबुराव पाचर्णे, ९६) चिंचवड – लक्ष्मण जगताप, ९७) पुणे पर्वती – माधुरी मिसाळ, ९८) कसबा पेठ – मुक्ता टिळक, ९९) भोसरी- महेश लांडगे, १००) वडगाव शेरी – जगदीश मुळीक, १०१) शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे, १०२) खडकवासला- भीमराव तापकिर, १०३) हडपसर- योगेश टिळेकर, १०४) कोपरगाव- स्नेहलता कोल्हे, १०५) सातारा-शिवेंद्रराजे भोसले, १०६) कराड दक्षिण-अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष), १०७) नेवासा- बाळासाहेब मुरकुटे, १०८) शेवगाव- मोनिका राजळे, १०९) श्रीगोंदा-बबनराव पाचपुते, ११०) कर्जत जामखेड- राम शिंदे, १११) गोराई-लक्ष्मण पवार, ११२) माजलगाव -रमेश अडसकर, ११३) अष्टी- भीमराव धोंडे, ११४) अहमदपूर- विनायक किसन जाधव-पाटील, ११५) निलंगा-संभाजी पाटील-निलंगेकर, ११६) सोलापूर शहर उत्तर- विजयराव देशमुख, ११७) सोलापूर दक्षिण-सुभाष देशमुख, ११८) वाई – मदन भोसले, ११९) कोल्हापूर दक्षिण-अमल महाडिक, १२०) इचलकरंजी-सुरेश हाळवणकर, १२१) मिरज-सुरेश खाडे, १२२) सांगली -सुधीर गाडगीळ, १२३) शिराळा -शिवाजीराव नाईक, १२४) जत -विलासराव जगताप, १२५) अंधेरी पश्चिम-अमित साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -